Saturday, 5 September 2015

श्री कृष्णा प्रसन्न -किती सांगु मी सांगु कुणाला

किती सांगु मी सांगु कुणाला,
आज आनंदी आनंद झाला  ll

अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसु गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून ,गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला
आज आनंदी आनंद झाला  ll

मूर्ति अशी साजिरि ,ओठावरी बासरी भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ
कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून ,गोपबाळे धरून
सांज सकाळी गोपाळ काला
आज आनंदी आनंद झाला  ll

खेळ असा रंगला ,खेळणार दंगला टिपरीवर टिपरी पड़े
लपुनछपून गिरिधारी, oमारीतो पिचकारी
रंगांचे पड़ती सडे
फेर धरती दिशा , धुंद झाली निशा
रासरंगाचा झाला उजाला
आज आनंदी आनंद झाला ll

No comments:

Post a Comment