हे देवा तुझ्या दारी आलो दर्शन घ्याया
खारीक खोबरे गुलाल दवणा वाहुनिया पाया
दंडवत घालितो मी शरण तुज राया
धाउनी ये भक्ताचे रक्षण कराया
चांगभला चांगभला जोतीबाचा चांगभला
चांगभला चांगभला जौतिबाचा चांगभला ll
ज्योतीर्मय रुप तुझे चतुर्भुजधारी
खड्ग डमरु त्रिशूल घोड्यावर स्वारी
रत्नासुराला वधाया आला रत्नागिरी
हाती घेऊन अमृतपान जनांसि उद्धारी
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
कृपादृष्टी आम्हांवरी असु द्यावी राया
चांगभला चांगभला जौतिबाचा चांगभला
चांगभला चांगभला जौतिबाचा चांगभला ll
काळभैरव चर्पटअम्बा आणि महामाया
दुष्ट दैत्य दमनासाठी आली ती साहाय्या
पंचगंगेच्या किनारी , सह्याद्री पठारी
भक्तांचा तु कैवारी ,ऊभा रत्नागिरी
हे नाथा तुला वंदितो मी असु द्यावी माया
दीन दुबळयांवरती असु द्यावी छाया
चांगभला चांगभला जोतिबाचा चांगभला
चांगभला चांगभला जोतिबाचा चांगभला ll
No comments:
Post a Comment