|| श्री स्वामी समर्थ ||
~~~~देवघर~~~~~
घरात देवघर असणे आवश्यक आहे. पण ते योग्य स्थानी असेल तरच मनालाहीशांती मिळते. देवाची पूजा आपण करतो पण देवघर कुठे असावे याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे हवे असलेले फळ आपल्याला मिळत नाही. चला तर मग वास्तुशास्त्रानुसार घरात देवघर कुठे असावे याची माहिती घेऊ या.मोठ्या शहरांमध्ये जागा कमी असते. त्यामुळे वेगळे देवघर शक्य नसते. पण आजही बर्याच घरांमध्ये वेगळे मंदिर किंवा घरात वेगळी खोलीही तयार केलेली असते. बर्याचदा देवघर चुकीच्या जागी तर नाही ना? त्यातील मूर्ती किंवा चित्रांचे तोंड उलट्या दिशेने तर नाही ना? पूजा करीत असताना आपण त्याच्याकडे तोंड करून बसलो तर दिशा बरोबर आहे ना? हे प्रश्न पडतात. त्याचीच उत्तरे येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.घरातील देवघर एकशक्तीशाली ऊर्जेचा स्त्रोत असतो. त्यामुळे हा स्त्रोत घरात जागोजागी पसरलेला नको. सांगण्याचे ताप्तर्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन किंवा तीन देवघरे नको. एकाच कुटूंबातील काहीजण आपापल्या बेडरूमजवळ वेगवेगळे देवघर बनवितात. पण वास्तूशास्त्राच्या दृष्टीने हे अयोग्य आहे. असे केल्याने घरातील सदस्य नेहमी मानसिक तणावात असतात. आणि त्यांना शांत झोपही येत नाही. जागोजागी देवाच्या प्रतिमा किंवा चित्रे मंदिरात ठीक आहेत, पण घरात नाही. संयुक्त कुटूंबात तर एकाच जागी देवघर असणे अत्यावश्यकअसते. मग कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या सोयीनुसार एकत्र किंवा वेगवेगळी पूजा करू शकतात.नवीन घर बांधत असाल तरउत्तर-पूर्वेला म्हणजे ईशान्य कोपर्यात देवघर करणे सवोत्तम आहे. या कोपर्यात मंदिर ठेवणे आणि मूर्तींचे मुख पश्चिमेकडे करणे उत्तम असते. ईशान्य कोपरा देवतांचे गुरू बृहस्पती आणि मोक्षकारक केतुची दिशा मानली जाते. ईशान्य कोपर्यात शंकर विराजमान असतात. आणि त्यांचे एक नाव ईशान आहे. ईशान्य कोपरा आध्यात्मिक कार्यासाठी सगळ्यात उत्तम आणि शक्तीशाली आहे..
|| स्वामी समर्थ ||
Monday, 4 July 2016
घरातील देवघराची योग्य जागा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment