Wednesday, 20 July 2016

स्वामी समर्थ -आम्ही नमू दीनानाथ सदगुरु

ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll
ll श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज की जय ll
अभंग:- १७
सौजन्य:- परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमशिष्य भक्तशिरोमणी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज रचित अभंगवाणी व स्वामीकाव्य

अभंग:- १७
=======
आम्ही नमू दीनानाथ l श्री गुरु स्वामी हा समर्थ l १ l
तोची बुद्धीचा दातार l भक्तवत्सल करुणाकर l २ l
चौदा विद्या चौसष्ट कळा l ज्याच्या दारीचा धुरोळा l ३ l
वेद जेथे लोटांगणी l नेती बोलती वदनी l ४ l
च्यारी मुक्तीची पायरी l सदा झुले ज्याचे द्वारी l ५ l
आणिकाची कथा काय l शिव वंदी भावे पाय l ६ l
कर जोडी शारंगधर l होऊनी पायाचा किंकर l ७ l
ब्रह्मा बापुडा तो किती l काळा लागी ज्याची भीती l ८ l
देव दानव किंकर l मुनी घेती निराकार l ९ l
तया मानव भुलुनी गेले l अभिमाने नागवले l १० l
आनंद म्हणे दीनानाथ l निर्गुण की समर्थ l ११ l  

ll अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय हो ll
ll श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ll

No comments:

Post a Comment