चांगभलं र चांगभलं , देवा जोतिबा चांगभलं
जोतिबाचा चांगभल , श्रीनाथाचा चांगभलं l
माया ममता गुलाल उधळू,
भावभक्तीची फूल र , भावभक्तीची फूल
चांगभल र चांगभलं ,देवा जोतिबा चांगभलं ll
तुझ्या नावाचा र डंका, वाजविती लोकांमधी
तुझ्या चरणाच् तीर्थ,माय पंचगंगामधी
दर्शन घ्याया तुझ्या दयाळा,
मन हे वेडावल र, मन हे वेडावल
चांगभलं र चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं ll
No comments:
Post a Comment