Thursday, 14 July 2016

हाउसिंग सोसाइटी कारपार्किंग नियम

parking AAA अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे १५ सदस्य असून, चारचाकी वाहने ठेवण्याचा जागा मर्यादित आहेत. आम्ही ('सोसायटी'च्या व्यवस्थापकीय समितीने) प्रत्येक सदस्याला त्याचे एक चारचाकी वाहन त्याच्या सोयीअनुसार ठेवण्यास पार्किंगची जागा दिली आहे. परंतु एका सदस्याच्या तीन मोटारी असून, 'बाय लॉज'प्रमाणे कोणतीही एक गाडी, जिचा अर्जात तो क्रमांक देईल, तीच फक्त पार्क करावी असे त्याला कळविले आहे. इतर दोन गाड्या 'सोसायटी'च्या जागेत ठेवल्यास नियमाअनुसार कारवाई केली जाईल, हेही त्याला कळविण्यात आले आहे. पण त्या सदस्याचे म्हणणे असे की त्याच्या तिन्ही गाड्यांचे क्रमांक व आवश्यक ती कागदपत्रे तो 'सोसायटी'ला देईल व तीन गाड्यांपैकी कोणतीही एक गाडी तो त्याच्या सोयीप्रमाणे पार्क करील. 'बाय लॉज'मध्ये याबाबत स्पष्टता नसल्यामुळे कृपया कायदेशीर बाजू काय आहे हे आम्हाला स्पष्ट सांगावे, म्हणजे आम्ही संबंधित सभासदाला त्याप्रमाणे कळवू. आमच्या 'सोसायटी'त तीन दुकानदार सदस्य आहेत. त्यांना संपूर्ण दिवस आणि रात्रीसुद्धा 'सोसायटी'च्या जागेत कार पार्किंग करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? की ते त्याच्या व्यवसायाच्या वेळेपुरतेच (बिझनेस अवर्स) कार पार्किंग करू शकतात? — पी. डी. आर. (एक 'सोसायटी' सचिव), मुंबई. उत्तरः मला तुमचे दोन्ही प्रश्न योग्य वाटत नाहीत, कारण त्यातून कोती आणि संकुचित मनोवृत्ती दिसते आहे. एखाद्या सदस्याने त्याला वितरित करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत त्याच्या तीनपैकी एक कार पार्क केली तर त्यात 'सोसायटी'चे काय नुकसान होते? तुम्ही सर्व संबंधितांनी का चिंता करावी आणि निर्बंध लागू करून सक्ती करावी की त्याने विशिष्टच कार त्याच्या पार्किंगच्या जागेत ठेवावी? पार्किंग त्या सदस्याचे आहे आणि कायद्याप्रमाणे तो त्याच्या मालकीची कोणतीही कार त्याच्या पार्किंगच्या जागेत ठेवू शकतो. जर तो सदस्य अन्य कोणाची कार त्या जागेत पार्क करीत असता तर परिस्थिती वेगळी असती. दुकानदारांच्या पार्किंगच्या बाबतीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत मी तुम्हाला असे विचारतो की 'सोसायटी'ला पार्किंगच्या जागा 'शिफ्ट बेसिस'वर देण्याची इच्छा आहे का? अन्यथा दुकानदारांनी त्यांच्या मोटारी फक्त दुकाने चालू असतानाच्या वेळेतच ठेवावीत की कसे, असे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. दुकानमालक हेही 'सोसायटी'चे सदस्य आहेत आणि त्यांना इतर सदस्यांप्रमाणेच हक्क आहेत. ते आपल्या मोटारी त्यांना वितरित करण्यात आलेल्या जागेत ठेवू शकतात आणि त्यांच्यावर तुमच्या मनात आहे त्याप्रमाणे निर्बंध लागू केले जाऊ शकत नाहीत. प्रश्नः मुंबईतील एका नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी सदस्य असून गेल्या नऊ वर्षांपासून माझ्या सदनिकेत राहत आहे. मी देत असलेल्या मासिक देखभाल शुल्काच्या पावत्या 'सोसायटी' माझ्या नोंदणीकृत असलेल्या नावावर देत आलेली आहे. अलीकडेच 'सोसायटी' व बिल्डर यांच्यात अभिहस्तांतर करार ('कन्व्हेयन्स डीड') झाला. या 'डीड'मध्ये 'सोसायटी'कडे नोंदणीकृत असलेले माझे नाव दाखविलेलेच नाही, उलट त्याऐवजी माझी दोन वेगळी आडनावे दाखविलेली आहेत. मी 'सोसायटी'ला पत्र देऊन सदर चूक निदर्शनास आणली व ती दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. परंतु 'सोसायटी' कसलीच कार्यवाही करण्यास तयार नाही. उलट 'सोसायटी'ने चुकीची आडनावे असलेली दोन नावे तशीच ठेवली व एक चुकीचे आडनाव ('सरनेम') रजिस्ट्रेशनसाठी पाठविले आहे. माझ्या सदनिकेची नोंदणी आधीच झालेली आहे व 'सोसायटी'च्या दफ्तरात (रेकॉर्ड) असलेले नाव बरोबर आहे. बिल्डरने सदनिका खरेदीच्या वेळीच सदनिका खरेदीविक्री कराराची, रजिस्ट्रेशनची प्रत व इतर शुल्के भरल्याच्या पावत्या 'सोसायटी'ला दिलेल्या आहेत. तरीही 'सोसायटी'ने उपनिबंधक, सहकारी संस्था यांना माझे नाव चुकीचे पाठविले आहे. याबाबत मी काय कायदेशीर कारवाई करू शकतो? — एक 'मटा' वाचक, मुंबई. उत्तरः तुम्ही नोंदणी प्राधिकरणाला पत्र लिहून हे निदर्शनास आणू शकता की तुमचे आडनाव चुकीचे देण्यात आलेले आहे. दस्तऐवज नोंदणीकृत होण्यापूर्वीच प्राधिकरण 'सोसायटी'ला नावाची दुरुस्ती करण्यास भाग पाडू शकते. ( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.) Specialized beauty & hair therapies nearby Ad Times Classified Whatsapp Facebook Google PlusTwitter Email SMS Web Title: HOUSING SOCIETY Column- Member is free to park any of his cars in his parking lot (Marathi News from Maharashtra Times , TIL Network) मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा अर्थ 02:32 भारताचा जूनमधील व्हीपीआय १.६२ टक्के, तर महागाई ... 02:10 'भेल'चा बांगलादेशमध्ये प्रकल्प 09:13 रॉकेलच्या किमतीमध्ये २५ पैशांनी वाढ 02:13 USFDA पुन्हा सन फार्माची तपासणी करणार 01:20 Cairn Energy कंपनीला भारताकडून हवी भरपाई 02:07 एअरसेलकडून ४जीचे हक्क विकत घेण्याची एअरटेलची तय... 01:26 स्मार्टफोन युझर्समध्ये 'पोकेमॉन गो' सुपरहिट 02:28 शेअर बाजाराने गाठला ११ महिन्यांतील उच्चांक 01:37 सेन्सेक्सने गाठला १० महिन्यातला उच्चांक 06:43 'टाटा'ची इंग्लंडमधील मालमत्ता विकण्याचा निर्णय ... 03:09 द. अफ्रिकेतील खाण प्रकल्पांत वेदांता १ अब्ज डॉल... आणखी अर्थ FROM THE WEB Find best resort for your vacation in Konkan Ad Times Classified Website & mobile apps at the best prices Ad Times Classified Build & manage your online business Ad Times Classified Make your business online & digitized today Ad Times Classified FROM MAHARASHTRA TIMES स्क्रॅप बसमध्ये होणार मोबाइल टॉयलेट डेंग्यूचा पहिला मृत्यू सेन्सेक्सने गाठला वर्षातील उच्चांक मसाज करताना नस दाबली गेल्यानं ब्रेन स्ट्रोक Recommended By Colombia प्रॉपर्टी विकासक निवड प्रक्रिया पुन्हा सुरूवातीपासून करावी लागेल मुंबईत गुंतवणूक करताना… बिल्डर ‘सोसायटी’चा सदस्य बनू शकतो इमारती ‘म्हाडा’च्या ताब्यात दिल्यास पुनर्विकास शक्य आणखी प्रॉपर्टी एक दृष्टिक्षेप बातम्या: महाराष्ट्र देश थोडक्यात बातमी विदेश सिटी न्यूज अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक करिअर लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको लाइव टीव्ही इतर फोटो धम्माल व्हिडिओ फोटोगॅलरी आमच्या इतर साइट्स: தமிழ்తెలుగుമലയാളംবাংলাગુજરાતીहिन्दीಕನ್ನಡEnglish आमच्या बद्दलवापर अटीडेस्कटॉप आवृत्ती Copyright © 2016 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: Times Syndication Service

4 comments:

  1. सहकारी गृहनिर्माण संस्था ‘देखभाल खर्च’ नियम: प्रत्येक सदनिकेच्या संबंधात समितीकडून संस्थेचा खर्च निश्चीत करणेबाबत, सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधी ६७(ब) मध्ये, “उपविधी क्रमांक ६७(अ) मध्ये निर्धारित केलेल्या तत्वांच्या आधारावर समिती ‘प्रत्येक सदनिकेच्या’ बाबतीत संस्था शुक्ल आकारणी निश्चित करील. मात्र सर्व भूगागांना जरी त्याचे क्षेत्रफळ कमी अधिक असले तरी सदरची आकारणी ‘समप्रमाणात’ असेल’.
    माहिती: काही सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सदनिका’ व्यतिरिक्त, तळमजल्यासह ‘गाळे-दुकाने’, ‘गार्डन-फ्लट’, ‘रो-हाँउसेस’, ‘टेरेस-फ्लट’, ‘पेंट हाउस’, ‘ऑफिस’, खाजगी मंगल ‘कार्यालय-हॉल’ असे कमी अधिक क्षेत्रफळ असलेले बांधकाम असते. वरील नियम हा फक्त ‘सदनिका’ साठी आहे की ‘सदनिका व्यतिरिक्त’, ह्यांच्याही साठी आहे. या बाबत माहिती देणेची विनंती. ‘सदनिका’ व ‘सदनिका व्यतिरिक्त’ शुक्ल आकारणी ‘समप्रमाणात’ आकारावी का ?

    पी.के.शेवाळे,
    9422646894
    pralhadkshewale@gmail.com
    08/08/2018…PUNE.

    ReplyDelete
  2. सहकारी गृहनिर्माण संस्था ‘देखभाल खर्च’ नियम: प्रत्येक सदनिकेच्या संबंधात समितीकडून संस्थेचा खर्च निश्चीत करणेबाबत, सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधी ६७(ब) मध्ये, “उपविधी क्रमांक ६७(अ) मध्ये निर्धारित केलेल्या तत्वांच्या आधारावर समिती ‘प्रत्येक सदनिकेच्या’ बाबतीत संस्था शुक्ल आकारणी निश्चित करील. मात्र सर्व भूगागांना जरी त्याचे क्षेत्रफळ कमी अधिक असले तरी सदरची आकारणी ‘समप्रमाणात’ असेल’.
    माहिती: काही सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सदनिका’ व्यतिरिक्त, तळमजल्यासह ‘गाळे-दुकाने’, ‘गार्डन-फ्लट’, ‘रो-हाँउसेस’, ‘टेरेस-फ्लट’, ‘पेंट हाउस’, ‘ऑफिस’, खाजगी मंगल ‘कार्यालय-हॉल’ असे कमी अधिक क्षेत्रफळ असलेले बांधकाम असते. वरील नियम हा फक्त ‘सदनिका’ साठी आहे की ‘सदनिका व्यतिरिक्त’, ह्यांच्याही साठी आहे. या बाबत माहिती देणेची विनंती. ‘सदनिका’ व ‘सदनिका व्यतिरिक्त’ शुक्ल आकारणी ‘समप्रमाणात’ आकारावी का ?

    पी.के.शेवाळे,
    9422646894
    pralhadkshewale@gmail.com
    08/08/2018…PUNE.

    ReplyDelete
  3. आमच्या सहकारी गृहनिर्माण सोसायटी मध्ये फ्री पार्किंग आहे तसेच विंग प्रमाणे गाडी पार्क करण्याचे नियम आहे,माझे वाहन मी 2016साला पासुन आमच्या विंग च्या आवारात पार्क करतो,परंतू दुरसा एक सदस्य ज्याने 2017साली वाहन विकत घेतले व तेव्हा पासुन तो आमच्याच विंग च्या आवारात पार्क करतो,परंतू काही दिवसांपूर्वी आमचे वाहन अनुपस्तीथ असताना त्या व्यक्तीने त्याचे वाहन आमच्या वाहनतळाच्या ठिकानी लावले आहे... तर आम्हाला आमचे वाहनतळ पुन्हा मिळेल अशी काही कायद्यात तरतूद आहे का.?

    ReplyDelete
  4. Mala सोसायटी कार पार्किंग देत नाही मी सोसायटी मेंबर आहे काय करता येईल का नाही

    ReplyDelete