🔹 वैशवानरविद्या 🔹
----------------------
ग्रह, तारे, आकाशगंगा कशा निर्माण झाल्या ? पृथ्वीचा विकास काय ? अतितकाळात पृथ्वीवर कशा प्रकारचे वातावरण होते ? समाज कसा होता ? परग्रहावर मानव आहे का ? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत ; परंतु हे सर्व जाणण्यासाठी योगामध्ये काही सोप्या साधना सांगितलेल्या आहेत. अशा अनेक साधनांपैकी हि एक " वैश्वानर विद्या "-
या विद्येने साधक आपल्या देहातून बाहेर पडतो ; व सुष्म शरीराने पृथ्वीवर तसेच अंतराळात कुठेही भ्रमण करू शकतो. सुष्म शरीर हे त्रिमितीच्या सर्व कक्षापलीकडील असल्याने या सुष्म देहाला भिंत अडवू शकत नाही. क्षुधा , तृष्णा , यांची बाधा होत नाही.मनोवेगाने हे संपूर्ण ब्रह्मांडात कुठेही भ्रमण करू शकते.त्रिमितीचा मर्यादा या सुष्म देहाला नसल्याने वातावरणात फिरणारे आत्मे दिसू लागतात.त्यांचे विचार जाणून घेता येतात.मनोवेगाने शुक्र, मंगळ, व गुरू इत्यादी ग्रहावर जाऊन तेथील वातावरण व जीवश्रुष्टीचा अभ्यास करता येतो.इतकेच नव्हे तर त्याही पलीकडे ब्रह्मांडात सर्वत्र संचार करता येतो . प्रत्येक लोकांतील आत्मयांशी संपर्क साधून , भेट घेऊन विविध प्रकारचे ज्ञान मिळवता येते. याशिवाय पृथ्वीवर एका देशातून दुसऱ्या देशात कुठेही दिवसा वा रात्री केव्हाही जाता येते.वैश्वानर विद्या हस्तगत झाल्यावर एका क्षणात मनोवेगाने ब्रह्मांडाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन , ज्ञान मिळवून , दुसऱ्या क्षणाला पुन्हा परत येता येते.याशिवाय सुष्म देहाला कुठलीही भाषा समजते.त्यामुळे भाषेचाही प्रश्न येत नाही.आकाशलेख ( Akashik Record ) दिसू लागल्याने पृथ्वीचा ब्रह्मांडाचा सर्व इतिहास आपोआप कळून येतो. ऊर्ध्व लोकांतील महासिद्धासी संपर्क साधल्याने विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करता येते; याशिवाय या विद्येमुळे त्रिकालज्ञान, पूर्वजन्माचे ज्ञान , इत्यादी विविध ज्ञानमार्ग मोकळे होतात.
या विद्येची साधना फारशी कठीण नसली तरी नियम मात्र कठीण आहेत.नियमभंग करणाऱ्या जवळ हि विद्या रहात नाही म्हणून नियम प्रथम समजून घेणे आवश्यक आहे .
१) हि विद्या साध्य करू इच्छिणाऱ्याने शत्रू , मित्र , असा भाव मनात ठेऊ नये.द्वेष, मत्सर करू नयेत.
२) या विद्येने प्राप्त होणारे ज्ञान शक्यतो उघड करू नये. ( वयक्तिक अथवा व्यक्तिगत ) परलोक तथा अन्य सामान्य ज्ञान उघड करण्यास हरकत नाही .
३) कुठल्याही व्यक्तीच्या खासगी जीवनात डोकावू नये .
४) शत्रू ( परराष्ट्र ) भेद जाणून ते आपल्या राष्ट्राला सांगू नयेत .
५) पोट गच्च भरलेले असतांना या साधनेचा फारसा उपयोग होत नाही म्हणून अर्धपोटी असतानाच हि साधना करावी .
वरील नियम पाळून ही साधना करावयास हरकत नाही .
साधनेची पध्दती -
---------------------
योगातील शवासना प्रमाणे सरळ पाठीवर झोपावे. एक दोन वेळा नाकाने दीर्घ श्वसन करून तोंडाने ( तोंडाचा आकार नळी सारखा करून) जोरात श्वास सोडावा ; नंतर शांतपणे पडून श्वाशोस्वासवर लक्ष ठेऊन मनातल्या मनात जप करीत रहावे. डोक्याखाली उशी घेऊ नये . शरीर सैल सोडून पडावे. नंतर मनानेच प्रथम पायाच्या अंगठ्याकडे पहावे व तेथून हळूहळू वरवर मनाने पहात आपल्या डोक्यापर्यंत पहात यावे , कल्पना करावी कि , आपण आपल्या देहाच्या बाहेर पडत आहोत .हळूहळू अनुभव येईल कि , पायापासून शरीरातील चेतना वरवर सरकत आहे व नंतर गळ्यापर्यंत ते चैतन्य येऊन थांबले आहे. हळूहळू गाल , ओठ , डोळे व डोके सुन्न पडत आहे.असे वाटेल , कदाचित यावेळी तुम्हाला एखादा शॉक बसल्याप्रमाणे झटका बसेल व तुम्ही मूळपदावर याल , म्हणजे आतापर्यंत केलेला प्रयत्न फुकट गेला असे समजावे, व पुन्हा किंवा दुसऱ्या दिवसी तसाच प्रयत्न करावा.
या प्रयत्नात तुम्हाला एक अनुभव नक्की येईल कि , अवघ्या दोन किंवा तीन मिनिटात तुम्हाला खूप उत्साह प्राप्त झालेला आढळून येईल. तुमचा थकवा दूर झालेला आहे , तुम्ही आणखी खूप काम करू शकाल एवढा उत्साह तुम्हाला प्राप्त झालेला असेल , या साधनेचा हा अनुभव अगदी सुरुवातीला दिसून येतो.
पुष्कळवेळा अशा पध्दतीने प्रयत्न करीत असताना गाढ झोपही लागते.निद्रानाशाचा रोग असणार्यांना या पध्दतीचा फार चांगला उपयोग होतो.
याच अवस्थेमध्ये ध्यान केले असता कुंडलिनी जागृतीचाही अनुभव येतो. अशाप्रकारे साधना सुरु असताना काही दिवसातच तुम्हाला असा अनुभव येतो कि , तुम्ही शरीराबाहेर अधांतरी उभे आहात. तुमचा देह निद्रिस्त अवस्थेत असलेला तुम्ही स्वतःच पहाता .
नंतर इकडे तिकडे फिरण्यास सुरुवात करावी , हळूहळू ते जमू लागेल. नंतर आकाशमार्गे तुम्हाला हव्या त्या ठिकाणी जाता येईल. परग्रहावरही काही क्षणात तुम्ही जाऊन तेथील सर्व माहिती मिळवून तुम्ही परत येऊ शकाल. वेदांमध्ये या साधनेला " वैश्वानर विद्या " म्हटलेले आहे. एकदा या साधनेची सवय झाली कि कालांतराने बसूनही देह सोडता येतो. हव्या त्या ठिकाणी जाता येते. सर्वसामान्य माणसास दिसून न येणाऱ्या गुप्तरूपाने तपस्या करणाऱ्या , अनेक सिद्धयोग्यांचे दर्शन तुम्हाला घेता येतात. स्वर्गातील तसेच परलोकातील उच्चकोटीच्या महातम्यांशी तथा देवतांशी संपर्क साधून किंवा भेट होऊन ज्ञान मिळवता येते. परलोकात जेवढे म्हणून लोक अस्तित्वात आहेत त्या सर्व लोकात जाऊन तेथील सर्व माहिती तुम्हाला मिळविता येते. भूत , भविष्य व वर्तमान तीनही काळाचे ज्ञान तुम्हाना आपोआप येऊ लागते. या प्रयोगाची चांगली सवय झाल्यावर , प्रयोग करते वेळी कुणाला तरी सांगून ठेवावे , कारण ज्यावेळी आपण शरीराबाहेर असतो तेव्हा आपल्या शरीराला कुणी अकारण हलविले , धक्का दिला तर आपल्याला वर त्याची जाणीव होऊन एका सेकंदात गणकण आपटल्या प्रमाणे आपण शरीरात घुसतो. शक्यतो हे प्रयोग एकांतात एकट्यानेच करावेत. येथे प्रश्न कदाचित तुमच्या मनाला भेडसावेल तो असा , या प्रयोगाने मृत्यू ओढवणार नाही ? याचे उत्तर देण्यापूर्वी मृत्यू म्हणजे काय ? हे समजायला हवे. माणसाचा सुष्मदेह व स्थूलदेह यांना जोडणारी रुपेरी रंगाची एक दोरी असते.(silver Cord ) जेव्हा तुम्ही देहाबाहेर पडता तेव्हा तुमच्या देहाच्या नाभीकमळातून एक रुपेरी दोरी बाहेर पडते. तुमचा स्थूलदेह व शुष्मदेह यांना हि रुपेरी दोरी चिकटलेली असते .
ब्रह्मांडाच्या अंतिम टोकाला जरी तुम्ही गेलात तरी तुमच्या स्थूलदेहाला व सुष्मदेहाला सांधनारी हि रुपेरी दोरी कधीही तुटत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही लांब जाऊ शकता . स्थूलदेहाशी तुमचा संपर्क तुटत नाही.
जेव्हा स्थूल देहाशी तुमच्या सुष्म देहाला जखडून ठेवणारी ही रुपेरी दोरी तुटते तेव्हा मृत्यू येतो.परमेश्वराने दिलेले मर्यादित आयुष्य जोपर्यंत संपत नाही , तोपर्यंत ही रुपेरी दोरी तुटतही नाही.जेव्हा आयुष्य संपते , तेव्हा स्थूलदेहाला जखडून ठेवणारी ही रुपेरी दोरी तुटते. जीव शुष्मदेहाबरोबर परलोकात जातो , म्हणून काहीही भीती न बाळगता हा प्रयोग करून पहाण्यास हरकत नाही .🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
🕉
लेखक :- स्वामी दत्तावधूत ( भारतीय गुढविद्या )
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
No comments:
Post a Comment