मिसळपाव करता करता सांडलवंड झाली
अरे पुन्हा चायनीज खाण्या बायको ही निघाली.
आम्ही चार पावांचीही आस का धरावी
जी मिसळ सांडे त्याची वाट का पहावी?
कसा गॅस उसळकटाच्या सांडतो पखाली..
कपाटात केले कुणी बंद घुशी साती
मीठतिखट सांडून झाले पहा धूळमाती
उरे चायनीज, उडपी एकमेव वाली
उभे स्वयंपाकघर हे झाले एक कार्यशाळा
इथे फरसाण्याचा चुरा पायाने लवंडला
कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली
धुमसतात अजुनी विझल्या जिर्याचे धुपारे
नवे खाद्य मागत उठते 'अर्धांग' हे सारे
हॉटेलची बिले ही आता पहा खिसा जाळी
No comments:
Post a Comment