Sunday, 20 November 2016

काल भैरवनाथाची सेवा आणि काळभैरवाष्टक

🚩🌝 *॥ श्री स्वामी समर्थ ॥*🌞🚩
_____________________

*श्रीकालभैरवनाथांची सेवा व श्रीकालभैरवष्टक पठणाचे महत्त्व :-*
______________________

🚩श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे.

🚩आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या 8*8=64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे होय.

🚩श्रीकालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकांस त्यांचे पूर्ण संरक्षण लाभते.

🚩श्रीकालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असुन यांना खोटेपणा चालत नाही, हे मुख्य कोतवाल दैवत आहे.

🚩श्रीकालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन  त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात.

🚩श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक अतिप्रिय आहे.

🚩श्रीकालभैरवनाथांना बाजरीची भाकरी, लाल लसणाची चटनी, काद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत, पूराणावरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे.

🚩तथा श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचेही पठण केले जाते. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी व पावरफुल आहे.

🚩श्रीकालभैरवाषटकस्तोत्राच्या नित्य सेवेत दररोज 11 वेळस पठण करावे.

🚩श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्यनियमित पठणाने विशालकिर्ती प्राप्त होते, काशीक्षेत्री वास करुन पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होतो, धर्म नीतीने वागण्याची बुद्धी-धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होते.

🚩असे हे मनोहारी कालभैरवष्टकाचे नित्य पठण ज्ञान मुक्तिचे साधन असुन विचित्र पणे पुण्य वर्धक जणु एक रहस्यच आहे,
    तथा सर्वप्रकारच्या शोकांचा - मोहांचा - दुःखांचा - दैन्याचा - लोभांचा -  कोपांचा नाश होतो. असे हे श्रीकालभैरवनाथांच्या नित्य सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्य पठण केले पाहीजे.

🚩प्रति अमावस्येला श्रीकालभैरवनाथांचा हार, नारळ, खडीसाखर, यथाशक्ती दक्षिणा, त्यांना आवडीचा नैवेद्य. अर्पण करुन, त्यांचा मानसन्मान करावा.

🚩श्रीकालभैरवनाथांचा पूर्णकृपाशिर्वाद प्राप्त होतो,

🚩श्रीकालभैरवनाथांचा बीज मंत्र :-
*"ॐ र्हां र्हीं र्हुं रुद्रमुर्तये कालभैरवाय नमः || "*--------दररोज 108 वेळा जप करावा.

|| श्रीकालभैरवनाथचरणार्पणमस्तु ||

श्री काळभैरावानाथांना जे वंदन करतात. त्यांना यमदूत वंदन करतात. श्री काळभैरावानाथांचा महिमा जे वाचवतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडेल !!

🍀🌾 *कालभैरवाष्टकम* 🌾🍀

*देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्*

*व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|*
*नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं*
*नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम|*
*कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं*
*श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम|*
*भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं*
*भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं|*
*विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*धर्मसेतू_पालकं* *त्वधर्ममार्ग्_नाशकम्*
*कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्|*
*स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्*
*नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्|*
*मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं*
*दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं*
*अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं*
*काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्|*
*नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*

*कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं*
*ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्|*
*शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्*
*प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे !*

No comments:

Post a Comment