Tuesday, 17 January 2017

उठा उठा ओ सकळिक, नाम घ्या ज्योतिस्वरूप

जोतिबाचा चांगभलं |

उठा उठा हो सकळीक, नाम मुखी घ्या ज्योतीस्वरूप
केदारनाथा केदारेश्वर ,जोतिबाची अनेक रूप  ||
ज्योती स्वरूप हे जगी प्रकटले
हिमालयाचे ध्यान सोडले
दिनदुबळयांची करून  सेवा
उंच डोंगरी चक्र धरिले ||1||   
रत्नासुराचा क्रोध प्रकटला
देव देवीला छळू लागला
त्रिशुलधारी ,खड्ग  घेउनि 
रत्नागिरी केदार प्रकटले ||२||
विमलाम्बुजा  पिता बैरागी
पुत्र तयांचे जगात ख्याती
आशिष देती भक्तजनांना
नाथांचा  अवतार  ||३||

No comments:

Post a Comment