जय जय जगदंबे ||
श्रीअंबे ||
रेणुके, कल्पकदंबे ||
जय जय जगदंबे ॥धृ०॥
अनुपम स्वरुपाची तुझि धाटी ||
अन्यनसे या सृष्टींतुजसमरुप दुसरें ||
षपरमेष्ठी ||
करितां झाला कष्टी शशिरस रसरसला ||
वदनपुटीं ||
दिव्यसुलोचन दृष्टींसुवर्ण रत्नांच्या ||
शिरिं मुकुटीं ||
लोपति रविशशि कोटी
गजमुखि तुज स्तविलें ||
हेरंबें ||
मंगल सकळारंभे ॥१॥
जय जय जगदंबे ॥धृ०॥
कुंकुम - चिरि शोभे ||
मळवटीं ||
कस्तुरीटिळक लल्लाटीं नासिक अति सरळ
||
हनुवटी ||
रुचिरामृत रस ओठींसमान जणुं लवल्या ||
धनुकोटी ||
आकर्ण लोचनभ्रुकुटीशिरिं निट भांगवळी
||
उफराटी ||
कर्णाटकची धाटीभुजंग निळ रंगा ||
परिशोभे ||
वेणि पाठिवर लोंबे ॥२॥
जय जय जगदंबे ॥धृ०॥
कंकणें कनकाचीं ||
मनगटीं ||
दिव्य मुद्या दश बोटींबाजूबंद नगे ||
बाहुवटीं ||
चर्चुनी केशर उटी सुगंध पुष्पांचे ||
हार कंठीं ||
बहु मोत्यांची दाटी आंगीं नवि चोळी ||
जरिकांठीं ||
पीत पितांबर तगटीपैंजण पदकमळीं ||
अति शोभे ||
भ्रमर धांवती लोभें ॥३॥
जय जय जगदंबे ॥धृ०॥
साक्षप तूं क्षितिच्या ||
तळवटीं ||
तूंच स्वयें जगजेठींओवाळित आरती ||
दीपताटीं ||
घेउनि करसंपुष्टींकरुणामृत ह्रदयें ||
संकटीं ||
धावसि भक्तांसाठींविष्णुदास सदा ||
बहुकष्टी ||
देसिल जरि निज भेटीतरि मग काय उणे ||
या लाभें ||
धाव पाव अविलंबे ॥४॥
|| जय जय जगदंबे ||
Saturday, 21 January 2017
जय जगदंबे श्री अंबे रेणुके
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment