Wednesday, 11 January 2017

रामाची डायरी

☘रामाची डायरी ☘
एकदा श्रीरामाकडे नारदमुनी आले. श्रीरामाच्या समोर एक मोठी वही होती. नारदमुनीनी विचारले ही कसली वही? तेव्हा श्रीराम म्हणाले यात माझ्या भक्ताची नावे लिहिली आहेत. श्रीरामाची परवानगी घेऊन त्यांनी ती वही पाहिली पण त्यात श्री मारूतीरायाचे नाव नव्हते, त्यांचे स्वतः चे नाव त्यात होते. त्याना गंमत वाटली. नारदमुनीच ते !ते श्रीमारूतीरायाकडे आले व म्हणाले "तु स्वतःला रामभक्त म्हणवितोस पण तुझे नाव त्या श्री रामाभक्ताच्या यादीत नाही ".मारूतीरायाला आश्चर्य वाटले मग विचार करून म्हणाले खरे आहे श्रीरामाकडे आणखीन एक लहान डायरी असते ती ते नेहमी आपल्या जवळ ठेवतात त्यात माझे नाव असेल.
नारदमुनी लगेच श्रीरामाकडे आले व त्यांना लहान डायरीविषयी विचारले. श्री रामाने विचारले हे तुला कोणी सांगितले? तेव्हा नारदमुनीनी श्रीमारूतीरायाने सांगितल्याचे सांगितले. श्रीराम म्हणाले हो तशी छोटी डायरी आहे व ती मी नेहमी माझ्या जवळ ठेवतो. नारदमुनीनी ती पाहावयाला मागितली तर त्यात पहिले नाव श्रीमारूतीरायाचे होते. तेव्हा नारदमुनीनी अशा श्रीरामभक्ताच्या दोन निरनिराळ्या याद्या ठेवण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा श्रीराम म्हणाले या मोठ्या वहीत जे भक्त माझे नाम घेतात त्याची नावे आहेत व छोट्या वहोत ज्या भक्ताची नावे मी घेतो त्यांची नावे आहेत.
यावरुन मी एखाद्या मोठ्या माणसाला ओळखतो यापेक्षा तो मोठा माणूस मला ओळखतो हे अधिक महत्वाचे आहे. ☘॥श्रीराम ॥☘

No comments:

Post a Comment