Saturday, 14 January 2017

गणपती बाप्पाला निरोप

गौरीचा त्या हात धरुनी निघून गेला बाप्पा
मखर रिकामे सुनेसुनेसे उरल्या मागे गप्पा..|

उडून गेली पिले गोजिरी किलबिल करूनी दूर
पुन्हा पुन्हा त्या आठवणींनी भरून येतो ऊर

डोळ्यामधूनी झरझर धारा बंद होईना कप्पा
गौरीचा त्या हात धरुनी निघून गेला बाप्पा..|

चार दिवस हे आनंदाचे कापूर जळून गेला
उरला थोडा प्रसाद मागे अजून भिजतो शेला

आवरसावर करीते आजी ओटीवरती आप्पा
डोळ्यामधूनी अजून वाहे आठवणी गिरसप्पा

गौरीचा त्या हात धरुनी निघून गेला बाप्पा..|

No comments:

Post a Comment