Saturday, 14 January 2017

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

|| श्री स्वामी समर्थ ||

अक्कलकोटी स्वामी प्रकटले जगउद्धारासाठी
आणि भक्तांसी म्हणती भिऊ नको मी तुझ्या आहे पाठी !!

।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।

या अभय वरदानाचा खोलवर विचार करावा.  हा एक सहा शब्दांचा महामंत्र आहे, असेच वाटेल.  त्यातील प्रत्येक शब्द हा चैतन्य निर्माण करणारा आहे.  म्हणूनच हा चैतन्य निर्माण करणारा महामंत्र आहे.  माणसाला भय वाटणे सहाजीकच आहे.  ही भिती बाह्य व अंतर्गत स्वरूपाची असते.  हिंस्त्र श्वापदं पाहून माणूस भय-भीत होतो,  पण तो जेव्हा एखादे अक्षम्य दुष्कर्म करतो,  त्यावेळी त्याच्या मनास केलेल्या वाईट कर्माची सतत टोचणी लागून राहाते, पर्यायाने तो घाबरतो, भयभीत होतो.  अशा संकटकाळी मला कोण वाचवणार ? असे वाटते.
    
योगायोगाने तो श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपल्या वाईट कर्माची कबुली देतो, अभयदान मागतो... श्री स्वामी या शरणागतीमुळे प्रसन्न होतात व म्हणतात, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।".  तू चूक केलीस, पण कबूलीही दिलीस, पुन्हा असे करू नकोस.  चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे.

स्वामींच्या या अभय वरदानामधील  "मी"  हा शब्द चैतन्ययुक्त आहे.  इतर कुणीही नको, कुणीही तुझ्यावर हल्ला करण्यास येवो,  "मी" आहे ना ?  " मग का घाबरतोस ?" असा या "मी" चा अर्थ आहे.  "मी"  या शब्दामुळे खरा आधार स्वामीच आहेत हे स्पष्ट होते.
    
पुढील शब्द " तुझ्या "  यातून तुझे-माझे नाते किती जवळचे, आपुलकीचे आहे, हे स्पष्ट होते.  त्यामुळे पाठीशी आहे, म्हणजे मी सतत सदैव तुझ्या जवळच आहे..!  शरणार्थी आलेल्या भक्तास,  स्वामींचे  हे चैतन्ययुक्त सहा शब्द लाख मोलाचे वाटतात, त्याला धीर देतात.....!
।।श्री स्वामी समर्थ।।

No comments:

Post a Comment