कृतार्थ करण्या जन्म आपुला|नित्य भजा गुरूवरा|
स्मरा हो दिगंबरासी स्मरा|स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा||धृ||
गुरूपदाला करता वंदन|संसाराचे तुटती बंधन|
सदैव स्मरूनी दत्तपदाला|ताप भवाचा हरा||१||
जिथे भक्तिने प्रभूचे गायन|तिथे विराजे अत्रीनंदन|
नामामृत हे अखंड सेवुन|जीवाला उद्धरा||२||
ज्ञानभक्तिच्या उजळुनी ज्योती|गुरूनामाची गात आरती|
सद्भावांच्या भावफुलांनी|पुजन गुरूचे करा||३||
स्मरा हो दिगंबरासी स्मरा|स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा||.…
No comments:
Post a Comment