सप्ताह-पारायण पध्दति... कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन " मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे. सोमवार - अध्याय १ व अध्याय २ मंगळवार - अध्याय ३ व अध्याय ४ बुधवार - अध्याय ५ व अध्याय ६ गुरुवार - अध्याय ७ व अध्याय ८ शुक्रवार - अध्याय ९ व अध्याय १० शनिवार - अध्याय ११ व अध्याय १२ रविवार - अध्याय १३ व अध्याय १४ रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा ).
No comments:
Post a Comment