Thursday, 9 February 2017

तंत्र अभ्यासाचे भाग्य यशाचे तंत्र भाग 3

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे ...*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*इयत्ता १० वी आणि १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय  मार्गदर्शन करणारी , विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि हमखास यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  *डॉ. गजानन पाटील*
    *DICPD रायगड*

        *भाग ०३*

     _*वाचन तंत्र ...*_

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*माझ्या प्रिय मुलांनो...*

*....सर्वसाधारणपणे अभ्यास म्हंटले की वाचनच समोर येते . आपण किती वेळा  वाचतो यापेक्षा कसं वाचतो याला अधिक महत्व असते . कारण एकाग्रता असली आणि तुम्हाला वाचन तंत्र अवगत असले तर तुम्हीच पाहिले आला म्हणून समजा .मी महाविद्यालयात शिकत असताना माझे अनेक मित्र रात्रंदिवस वाचतच असायचे . एक पुस्तक दहा दहा वेळा वाचायचे . मी मात्र एवढी खर्डेघाशी करण्याच्या फंदात न पडता  वाचन तंत्र अवगत करून घेतले आणि दिवसभरात दोन तास अभ्यास अर्थात वाचन , लेखन , मनन , चिंतन करून विद्यापीठीय सर्व परिक्षांमध्ये पाहिलाच येत राहिलो. त्याचे रहस्य तुम्हाला सांगणार आहे .*

*वाचनाच्या पध्दतीवरून वाचनाचे  दोन प्रकार पडतात. _१. आडवे वाचन_- यालाच आपण पारंपारीक पध्दती म्हणतो . जे आपण नेहमी अक्षर अन् अक्षर वाचतो , अर्धविराम , स्वल्पविराम, पूर्ण विराम आला की थांबतो .परिच्छेद बदलताना थांबतो .डावीकडून सुरू करून उजवीकडे संपवतो, परत मागे येवून परत सुरु करतो ते आडवे वाचन . हे वाचन करताना जिथे तुम्ही थांबाल तिथे तुमची एकाग्रता भंग पावते .विचारांची दिशा बदलते . त्यामुळे स्मरणात रहाण्याचे प्रमाण १० % नसते . तुम्ही कितीही रिव्हीजन करा स्मरणात रहातच नाही असा माझा स्वानुभव आहे . _२. उभे वाचन_  - एका पानावर पण, परंतू,आहे, नाही , व, आणि या सारखे कितीतरी शब्द सतत येत रहातात . ते टाळून पानाच्या मध्यभागी लक्ष केंद्रीत करून एकाग्रतेने मधलेच शब्द वाचत वाचत पूर्ण पानाचा अर्थ लावला जातो  त्या वाचनास उभे वाचन म्हणतात.  उभे वाचन प्रयत्नाने साध्य होते .मधले शब्द वाचून आजूबाजूच्या शब्दांचा अर्थ समजून जलद गतीने वाचण्याची ही पध्दत प्रयत्न साध्य आहे , अशक्य मात्र नाही . प्रथम प्रथम वृतमानपत्रातील संपादकीय या पध्दतीने वाचायला शिकलो नंतर नंतर कितीही  मोठे पुस्तक वाचू लागलो . यामध्ये एकाग्र चित्ताने वाचायचे असलेने आजूबाजूचे संदर्भ आकलन करून घ्यावे लागतात त्यामुळे आकलन होते शिवाय वाचलेले स्मरणात रहाते . असे माझ्या लक्षात आलेवर उभे वाचन करून सगळ्या संकल्पना , अवघड संबोध , गणितीय सुत्रे लक्षात ठेवण्याचे तंत्र कळाले .*

*हे तंत्र आत्मसात करण्याच्या पायऱ्या*

☄ *प्रथम वृतपत्रातील संपादकीय उभे वाचन करून सराव करावा .*
☄ *वाचताना एकाग्रता टिकली पाहिजे तरच बरोबर आकलन होते . हे लक्षात ठेवावे .*
☄ *पाठ्य घटक किंवा संदर्भ पुस्तके यांचे प्रथम आडवे वाचन करावे नंतर उभे वाचन करावे .*
☄ *उभे वाचन एक दिर्घ श्वास घेवून तो श्वास तसाच छातीत ठेवून १५ ते २० सेंकदात करावे . असे केल्याने स्मरणात दिर्घ काळ रहाते.*
☄ *१५ ते २० सेंकदात पान वाचून झाल्यावर डोळे बंद करून ते पान जसेच्या तसे पहायचे .कोठे कोणता शब्द आहे ते दिसेल . त्याची एकदा मेंदूत नोंद झाली की विस्मरण होत नाही .*
☄ *गणित, भूमिती किंवा विज्ञान मधील सुत्रे मात्र आडवे वाचन करुन लक्षात ठेवण्यासाठी डोळे मोठे करून ती पहायची आणि डोळे बंद करून फोटो सारखी मेंदूत क्लीक करायची . कायमची स्मरणात रहातात .*
☄ *आकलन करून एकदा आडवे वाचन झाले की उभे वाचन केल्यावर दिर्घकाळ स्मरणात रहाते.*
☄ *परीक्षा जवळ आलेवर शक्यतो एकाग्रचित्ताने उभे वाचन करावे .म्हणजे एक विषय दोन तासात पूर्ण होतो .*
☄ *उभे वाचन करण्यासाठी एकाग्रता खूप चांगली असावी लागते ती प्राप्त करून घेणेसाठी त्राटक तंत्र माहित असायलाच  हवे. ते आपण उद्याच्या भागात पाहू ..*

*( उद्याच्या भागात वाचा  _त्राटक तंत्र_  )*
    👁  👁
   
*धन्यवाद ! ! !*

  *डॉ.गजानन पाटील*

No comments:

Post a Comment