Thursday, 9 February 2017

तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे तंत्र भाग 2

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे ...*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*इयत्ता १० वी आणि १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय  मार्गदर्शन करणारी , विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि हमखास यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  *डॉ. गजानन पाटील*
    *DICPD रायगड*
🌿🍀🌴🌾🍁🌿☘

        *भाग ०२*

     _*स्मरण तंत्र ...*_
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*माझ्या प्रिय मुलांनो...*

*आपल्या परीक्षा पद्धती या स्मरणावरच आधारित असल्याने सारेजण स्मरणाला महत्व देतो . ज्याचे स्मरण चांगले तोच परीक्षेत पहिला येतो असे आज समिकरण झाले आहे . त्यामुळे त्यांचे स्मरण चांगले नसते असे विद्यार्थी नाउमेद होतात . घरापासून शाळेपर्यंत सर्वजण त्यास ढ म्हणून  संबोधतात .मी याच संवर्गातील असलेने वर्गात माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. पण पुढे मला असे समजले की , अरे स्मरणशक्ती ही काही अनुवंशिक नसते , कोणाची मक्तेदारी नाही , घराणेशाही नाही तर ती परिस्थिती साध्य आहे . आणि मग मी झपाटल्या सारखा कामाला लागलो आणि स्मरणशक्तीचा विकास करू शकलो . त्यायोगे आजही मला असंख्य गोष्टी , रंग - रूप, वस्तू , संख्या किंवा काहीही अचूक स्मरणात रहाते .मी स्वतःवर अनेकविध  प्रयोग करून जी तंत्रे विकसित केली आहेत त्यापैकी कांही तंत्रे आपणास सांगणार आहे . तुम्ही ती आत्मसात करा आणि बघा चमत्कार परीक्षेत कसे पाहिले येता ते ..*
            👁 👁
  🔷 *स्मरणशक्ती ही _एकाग्रतेवर_  अवलंबून असते .एकाग्र चित्ताने _ऐका ,वाचा ,पहा आणि अनुभवा_ .  १०० % स्मरणात राहिले म्हणून  समजा . त्यासाठी रोज सकाळी १० मिनिटे  _त्राटक_  करा . जे वाचतो , ऐकतो , पहातो किंवा अनुभवतो ते जाणीवपूर्वक करा ते मेंदूत १०० % रेकॉर्ड होते .*

🔷 *दररोज किमान ५ लिटर पाणी घोटाघोटाने प्या.*

🔷  *परीक्षा संपेपर्यंत सकाळ रात्री जेवून झालेवर १ पेरू खा . सर्दी होत असल्यास खावू नये .*

🔷  *परीक्षेच्या आगोदर किमान पंधरा दिवस जड अन्न खावू नका . प्रोटीन व फायबर युक्त पदार्थ खा .*

🔷 *एकाग्रता करताना सुरवातीला डोके दुखल्यास कच्चा पेरू उगाळून कपाळाला लावा कायमची डोकेदुखी थांबेल .*

🔷 *एक पान वाचल्यावर डोळे बंद करून ते पान आहे तसं आठवायचं त्यासाठी थोडा वेळ  _मनन आणि चिंतन_  करा .*

🔷 *प्रत्येक विषयांचे _मेंदूत कप्पे_  तयार करा . त्यानुसार विषय त्यात मांडत जा . असे केल्याने आवश्यकते नुसार ते स्मरणात येतात .*

🔷   *पाठय पुस्तकातील कोणताही घटक आपल्या _भाव भावनांशी_  जोडून आकलन करून घ्या म्हणजे तो जन्मभर लक्षात राहातो .*

🔷  *लघवी तटवून ठेवल्यावर  कोणताही अवघड घटक सहज समजून येतो आणि  त्याचे स्मरण होते असा माझा  स्वानुभव असलेने हे तंत्र आवश्यकतेनुसार वापरा .*

🔷   *रोज सकाळी वाटीभर दही खा . त्यामुळे स्मरणशक्ती वाढते .*

🔷   *जेवताना रोज एक टॉमेटो खात जा. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते .*

🔷 *रोज सकाळी अनुस्पोटी छोटा चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्याबरोबर खा .*

🔷  *हळद घालून रात्री झोपताना दूध प्या .*

🔷  *दररोज किमान ५ ते ६ तास शांत झोपा .*

*वर सांगितलेली सर्व तंत्रे वापरून मनन, चिंतन , मंथन करायला शिकलात तर तुमची स्मरणशक्ती १०० % विकसित होईल . यात तिळमात्र शंका नाही . आणि विशेष म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढली तर जास्त अभ्यास करण्याची सुध्दा गरज भासणार  नाही . ही स्मरणशक्ती अधिक प्रभावी करण्यासाठी वाचन तंत्र शिकायला हवे .*

*( उद्याच्या भागात वाचा  _वाचन तंत्र_  )*

*धन्यवाद ! ! !*

  *डॉ.गजानन पाटील*

No comments:

Post a Comment