Thursday, 9 February 2017

तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे भाग 1

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे ...*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*इयत्ता १० वी आणि १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय  मार्गदर्शन करणारी , विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि हमखास यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  *डॉ. गजानन पाटील*
    *DICPD रायगड*
🌿🍀🌴🌾🍁🌿☘

        *भाग ०१*

_*परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी ...*_
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*माझ्या प्रिय मुलांनो...*

*महाराष्ट्र राज्यात या महिन्यात  १२ वीची आणि पुढील महिन्यात १० वीची वार्षिक परिक्षा सुरू होत आहे. या परीक्षेची भिती विद्यार्थ्यांसह पालकांना असते .मी ऐनवेळी परीक्षेत आजारी तर पडणार नाही ना ? , मी केलेला अभ्यास मला पेपर सोडविताना स्मरणात राहील का ? , काही अडचण येईल का ? आई वडीलांच्या अपेक्षेप्रमाणे मला मार्क मिळतिल का ? असे असंख्य प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर ते बंद करा . कारण ही काही जीवनाची अंतिम परीक्षा नाही . त्यामुळे या परीक्षेला घाबरून जावू नका .पालकांचा तर कधी कधी खूप नकारात्मक विचार आणि सातत्याने मुलांवर ताण देण्याची सवय सगळ्यात वाईट आहे . ती प्रथम काढून टाका . मुलाला आनंदाने परीक्षा देवू द्या . त्याच्या कलाने घ्या.*
        *आणि हो , तुम्ही अजून लहान आहात . अशा खूप परीक्षा द्यायच्या आहेत तुम्हाला . ही केवळ एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठीची परीक्षा आहे . मग घाबरता कशाला ? मी चौथी आणि सातवीला वर घातला या सदारतला होतो , १० वी ला ३९ % गुण आणि १२ वीला चक्क मराठी विषयात नापास . आमचे प्राचार्य सर त्यावेळी म्हणालेले , आयुष्यात दोन शब्द बोलू शकणार नाहीस की, चार ओळी लिहू शकणार नाहीस .. त्यांच्या या बोलण्याने  मी मनाने ठरवलं आणि नेटाने  अभ्यास केला आणि केंद्रात पाहिला आलो . तेथून पुढे आजपर्यंत जेवढया पदव्या मिळविल्या त्यात पाहिलाच आलो . याचं रहस्य अगदी साधं आहे .मी परिक्षेला जाण्यापूर्वी मानसिक तयारी करायचो . आणि पाहिल्या नंबरमध्ये पास व्हायचो . आता तुम्ही म्हणाल की, ही मानसिक तयारी म्हणजे काय ? जसे आपण पोहण्यासाठी , सायकल चालविण्यासाठी मनाची एक प्रकारे तयारी करून ठेवतो त्यामुळे तर आपले मन आणि शरीर तयार होते. आपण तसा विचार करतो आणि मग मेंदूला तसे आदेश देतो  . मग मेंदू तसे काम करवून घेतो . त्यालाच मानसिक तयारी म्हणतात.*
     *म्हणून मुलांनो परीक्षेला जाण्यापूर्वी मी ही परीक्षा देणार आहे , ती चांगल्या मार्गानी मी उतीर्ण  होणार आहे , माझा  सर्व अभ्यास झाला असून तो परीक्षवेळी मला आठवणार आहे आणि ते मी अचूक लिहिणार आहे. अशा स्वयंसूचना मनाला द्या आणि पहा चमत्कार . यामुळे तुमचे मन  परीक्षेची उत्तम तयारी करेल . मग तुम्हाला परीक्षेची भिती वाटणार नाही . कसलंही दडपण तुमच्या मनावर येणार नाही . _स्वयंमसूचना_ देवून मनाची जबरदस्त तयारी करण्याचे  तंत्र शिकलात तर या परीक्षेत यशस्वी झालात म्हणून समजाच..*

*( उद्याच्या भागात वाचा _स्मरण तंत्र_ )*
*धन्यवाद ! ! !*

  *डॉ.गजानन पाटील*

No comments:

Post a Comment