Thursday, 9 February 2017

तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे भाग 6

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*तंत्र अभ्यासाचे... रहस्य यशाचे ...*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*इयत्ता १० वी आणि १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय  मार्गदर्शन करणारी , विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि हमखास यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  *डॉ. गजानन पाटील*
    *DICPD रायगड*

        *भाग ०६*

     _*परीक्षेत पहिलेच येण्याचे तंत्र*_

🚏🎖🏆🚏🎖🏆

*माझ्या प्रिय मुलांनो...*

*तसं पाहिलं तर कोणत्याही परीक्षेत पहिलं येणं खूप सोपं आहे, पण हे कधी शक्य आहे जेव्हा आपण स्वतः म्हणू तेव्हा .पाल्य तर कधी म्हणत नाही पण आपले पालक मात्र  सतत म्हणत असतात तू पहिलाच आला पाहिजेस. कसं शक्य आहे सांगा हे ? घोडयाला तलावापर्यंत घेवून जाण्याचे काम मालक करेल पण पाणी प्यायचं की नाही ते मात्र घोडाच ठरवेल. अशीच काहीशी गत पाल्याची झाली आहे . मुलांनो , तुम्हाला खरंच वाटतं का या परीक्षेत पहिलाच यावा ? जर आतून वाटत असेल तर १०० % शक्य आहे . कारण स्पर्धेच्या शिडीवर वरच्या पायरीवर फक्त एकटाच असतो . बाकीचे सगळे अधे- मधेच असतात . जर तुम्हाला वरच्याच पायरीवर जायचे असेल तर माझे हे तंत्र अवगत करा . कारण मी महाविद्यालयीन परीक्षा असो अथवा कोणतीही परीक्षा असो पाहिला येणार म्हंटल्यावर पहिलाच यायचो . अनेकांना अतिशोयक्ती वाटायची, पण माझ्या मनाशी मी ठरवूनच टाकायचो पाहिला म्हणजे पाहिलाच . निकाल जाहिर झाल्यावर म्हणायचो , दुसरा कोण आला ? अर्थात हा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता  तर फुल्ल कॉन्फिडन्स होता . तो कसा विकसित करायचा ते तंत्र मी आपणस सांगत आहे .*

🎖 *ज्या वर्गात तुम्ही प्रवेश घेतला आहे त्याच्या पहिल्याच दिवशी वर्गात पाऊल ठेवतानाच मनात ठाम ठरवा या वर्गातून मी पुढच्या वर्गात पाहिल्या नंबरनेच जाईन.*

🎖 *त्या दिवसापासून वर्गात जे जे शिकवलं जातं ते ते श्रवण करून फ्लॅश नोटस् काढायाला शिका .*

🎖 *दररोज जूनला २ तास , जुलैला ३ तास , ऑगष्टला ४ तास , सप्टेंबरला ५ तास , ऑक्टोंबरला ६ तास , नोव्हेंबरला ५ तास , डिसेंबरला ५ तास ,जानेवारीला ४ तास , फेब्रुवारीला ३ तास , मार्चला परीक्षेच्या आगोदर फक्त १ तास अभ्यास करायचा . या पध्दतीला मी  _सुलटी घंटा अभ्यास पध्दती_  असे नाव दिले .*

       *( तास )*
              |
           |  |   |   |   
       |   |  |   |   |   |  
    |  |   |  |   |   |   |  |  
|  |  |   |  |   |   |   |  |  
|  |  |   |  |   |   |   |  |   | 
J J A S O N D J F M   
         ➖ महिने➖  
*( सुलटी घंटा अभ्यास पध्दती  )*

🎖 *आपण सर्वजण परीक्षेच्या आगोदर रात्रंदिवस अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेत आजारी पडतो . असं होऊ नये म्हणून सुलटी घंटा अभ्यास पध्दतीचा वापर करा आणि बघा कसे पाहिले येता ते..*

🎖 *अभ्यासात सातत्य ठेवून मनन , चिंतन करायची सवय लावायची .*

🎖 *दैनिक , साप्ताहिक व मासिक वेळापत्रक तयार करून वर दिले प्रमाणे दररोज अभ्यास त्या त्या महिन्यात तितके तास एकाग्र चित्ताने करायचाच .*

🎖 *दररोज पहाटे उठल्यावर थोडा व्यायाम करून स्वतःला स्वसंमोहित करून सूचना द्यायची की मी पाहिलाच येणार आहे , माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे .मी केलेला अभ्यास माझ्या स्मरणात राहिला आहे .*

🎖 *जिथे तुम्ही अभ्यास करता तेथे तुमच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी ठळक अक्षरात लिहून ठेवा .  _मला परीक्षेत पहिलाच यायचे आहे ._*

🎖 *स्वतःच्या मनाची जबरदस्त तयारी करा . शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे वारंवार मनाला बजावून ठेवा . तरच मनाची चंचल वृती थांबेल . मन स्थिर राहील .*

🎖 *रोज रात्री झोपण्यापूर्वी शवासनात पडून रहा , डोळे मिटा , दिर्घ श्वास घ्या आणि दिवसभर केलेला अभ्यास , लेखन मनचक्षू समोर आणा . मनातल्या मनात रिव्हिजन करा आणि शांत झोपी जा.*

*कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय  हे तंत्र मी अवगत केल्याने प्रत्येक परिक्षेत यशस्वी झालो .तुम्ही प्रयत्न करून पहा .परीक्षेत पहिले येता का नाही !*

*( _उद्याच्या भागात वाचा   चिंतन व मनन तंत्र_  )*
  
   
*धन्यवाद ! ! !*

  *डॉ.गजानन पाटील*

No comments:

Post a Comment