श्री स्वामी समर्थ
शुभ सकाळ - स्वामी भक्तहो.
आर्त स्वरांनी आळविताची सदगुरु अवतरले l
स्वामी हे मन मंदिरी आले,स्वामी हे मम ह्रदयी आले ll धृ ll
हात जोडुनी स्वामी दर्शना,भाव फुलांचा मनी नजराणा l
दत्तरुप हे दिसता नयना,सौख्य नमा झाले ll
आर्त स्वरांनी आळविताची .........
प्रसन्न मुद्रा,स्मित हास्य हे,भाळी कुंकुम तिलक सुशोभे l
गळा हार ,हा गंध फुलांचा,मनोमनी दिसले ll
आर्त स्वरांनी आळविताची........
दंड,कमंडलू विराजीतसे दत्तप्रभुचे रुप दिसे l
दत्त स्वरुपी स्वामी दर्शने मन मंदिर झाले ll
आर्त स्वरांनी आळविताची........
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री गुरूदेव दत्त दत्त !!
स्वामी सकाळ
No comments:
Post a Comment