रंग बदलतात हो माणसे
सरड्यालाही लाज वाटावी इतक्या पटकन रंग बदलतात हो माणसे
क्षणात छाप क्षणात काटा शब्द बदलतात हो माणसे
क्षणात शब्द देऊन क्षणात शब्द मोडतात हो माणसे
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सावज शोधतात हो माणसे
आधारालाही हात देताना ही खेच टोचतात हो माणसे
उठवता उठवता ही दोन चारदा पाडतात हो माणसे
जखमेवर फुंकर मारताना ही मीठच फवारतात हो माणसे
आपला आपला म्हणत पाठीत घाव घालतात हो माणसे
रामाच रूप घेऊनही रावणाचीच पूजा करतात हो माणसे
सांत्वनाला आल्यावर ही काटे च पेरतात हो माणसे
मी नाही त्यातला म्हणत तशीच वागतात हो माणसे
केलेल्या उपकाराला क्षणात विसरतात हो माणसे
थोड्याफार स्वार्थासाठी जात बदलतात हो माणसे
दुसऱ्याच मन तिसऱ्या विषयी कलुषित करतात हो माणसे
प्रश्न पडतो मला खरच अशी का वागतात हो माणसे
स्वाभिमानसशून्य आयुष्य कशी जगतात हो माणसे
No comments:
Post a Comment