भुलू नको रे, भुलू नको । स्वामी चरण हे सोडू नको ।। जन्म लाभला तुला भला हा । विकारांपाशी गुंतू नको ।
सत्य सोडूनि असत्य मार्गी । सुंदर समजूनि धाऊ नको ।।क्षणभंगुर ही मौज मनाची । म्हणुनी पाप रे करू नको । स्वामी समर्थ दिले ज्ञान हे सेवा त्यांची चुकवू नको ।।
माजे माझे करुनि जन्मभर । स्वरतापाई मरु नको ।
मायबाप हे दैवत अवघे । आज्ञा त्यांची मोडू नको ।।
मतरुपी कांता सुंदर । तिची या वाचनि डोलू नको ।
एक अंदरी बाहेर दुसरे । भक्ती बेगडी करू नको ।।
परनारी जरी ही सुंदर । हाडां मांसावर भुलू नको।।
परनारी जरी सुंदर । हाडां मांसावर भुलू नको।
लंपट बमुनी कामसंगे । क्रोधाने जळू नको।।
सुखासाठी उगाच आटापिटा । वायू गतीने धाऊ नको।
तुझ्याचजवळी सौख्य अंतरी कोंडूनि त्याला ठेऊ नको।।
सत्य ते ठेव जपूंनी । अश्वातला पकडू नको।
अलवावरचे थेंब ची सारे। हा त तयाला लावू नको।।
एकनिष्ठ सदभक्ती ही । स्वामीपदा ची सोडू नको।
चिरशांती चा मार्ग सत्य हा। आडवतेला जाऊ नको।
दिंनदास हा विनवी समर्था । दूर त्याला लोटू नको।।
🌹🌷🌺श्री स्वामी समर्थ🌹🌺🌷
No comments:
Post a Comment