आज संकष्टी चतुर्थी...!!
॥ श्री गणेशाय नमः॥
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
विघ्नहर्ता गणपतीच्या नमनाने सर्व संकटे दूर होतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा-अर्चा केल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व :
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती आणि चंद्राची पूजा केली जाते. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील संकटे दूर होतात. गणपतीच्या आशिर्वादाने संतानसंबंधित सर्व समस्या दूर होतात.
गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ॥
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ॥
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ॥
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ॥
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥
॥श्री गणेशाची आरती॥
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
॥ मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया ॥
करा या स्त्रोताचे पठण:
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु: कामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्।
तृतीयं कृष्णापिंङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥
नवमं भालचंद्र च दशमं तु विनायकम्।
एकादशं गणपङ्क्षत द्वादशं तु गजानम् ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धकरं प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य:समर्पयेत्।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
संकष्टी चतुर्थी व्रतास ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी (आज पासून ) श्रावण कृष्ण चतुर्थीपासून सुरुवात करावी असे सांगितले आहे. हे व्रत २१ वर्षांचे आहे.२१ वर्ष न जमल्यास १ वर्ष तरी हे व्रत करावे. १ वर्ष सुद्धा न जमल्यास..
"अशक्तौ प्रतिवर्षं श्रावण कृष्णचतुर्थ्यामेव कार्यम् ।"
श्रावण कृष्ण चतुर्थी ला तरी हे व्रत करावे. कुठल्याही व्रताची सांगता शास्त्राप्रमाणे उद्यापन करावे लागते. ( व्रताला हवन सांगितले आहे , यज्ञ ही आपली संस्कृती आहे, होम हवन केले नाही तर देवतांना अन्न मिळत नाही )म्हणून कुठलेही व्रत सुरू करण्याचे पूर्वी जाणकार आणि योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.
॥ मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया ॥
No comments:
Post a Comment