जोतिबाचा चांगभलं |
उठा उठा हो सकळीक, नाम मुखी घ्या ज्योतीस्वरूप
केदारनाथा केदारेश्वर ,जोतिबाची अनेक रूप ||
ज्योती स्वरूप हे जगी प्रकटले
हिमालयाचे ध्यान सोडले
दिनदुबळयांची करून सेवा
उंच डोंगरी चक्र धरिले ||1||
रत्नासुराचा क्रोध प्रकटला
देव देवीला छळू लागला
त्रिशुलधारी ,खड्ग घेउनि
रत्नागिरी केदार प्रकटले ||२||
विमलाम्बुजा पिता बैरागी
पुत्र तयांचे जगात ख्याती
आशिष देती भक्तजनांना
नाथांचा अवतार ||३||
No comments:
Post a Comment