अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
पहिली माझी ओवी त्या दत्तगुरू च्या पायाशी
सार्थक करीन जन्माचे मी दिगंबराच्या चरणाशी ll
दुसरी माझी ओवी मी गुरुपादुका वंदीन
चराचरी जो व्यापून उरला अनसुयासुत प्रार्थींन ll
तिसरी माझी ओवी मी क्षणभर प्रपंच विसरिन
मीपण सारे जाळून मी सद्गुरुराया पूजिन ll
चौथी माझी ओवी मी गाणगापूरला जाईन
विनम्रभक्तीभावे मी भिक्षा मागून राहीन ll
पाचवी माझी ओवी मी औदुंबराला जाईन
दत्तगुरुचे नाम घेऊनि पारायण मी करिन ll
सहावी माझी ओवी मी नृसिंहवाडी पाहीन
दत्तगुरुची उपासना मी भक्तिभावे करिन ll
सातवी माझी ओवी मी काशीक्षेत्री जाईन
भोजन करिती दत्तप्रभु त्या तीर्थक्षेत्री राहीन ll
आठवी माझी ओवी मी माहुरगडाला जाईन
शयन देव ते करती तेथे दत्तमाऊली वंदीन ll
नववी माझी ओवी मी गिरनार पर्वत चढीन
प्रभू विश्रांती घेती तेथे माळ जपाची ओढीनं ll
दहावी माझी ओवी मी नारायणपुरला जाईन
गुरुवारी अन पौर्णिमेला दर्शन प्रभूंचे घेईन ll
No comments:
Post a Comment