Saturday, 20 January 2018

घरात अपशब्द बोलू नये

** अपशब्द घरात बोलल्यास,वास्तू तथास्तू म्हणते **

आपण सर्व जणच,कळत न कळत,आपल्या परिवारासोबत राहण्या-या व्यक्तीबरोबर,जीवनांच्या दैनंदिन गरजा पुर्ण करत असताना,एकाद्याला कमी पडते तसेच एकाद्याला कामाचा ञास जास्त होतो.किवा अनेक कारणामुळे घरातील एक दोन सदस्याबरोबर किरकोळ भांडण तंटे होत असतात..त्यावेळी एकमेकांना रागाच्या भरात आपण काहीतरी भयंकर बोलत असतो.आणि आपल्याच कुटुबांतील व्यक्ती बद्दल अहितकारी बोलत असतो.
ते ह्या प्रमाणे--तुझे वाटोळ व्हावे.तुझी नोकरी जावावी.तुला कधीच सुख मिळणार नाही.अन्न अन्न करीत बसशील.तुझ लग्न नाही होणार.हा माझा शाप आहे .तुला मुल मुल म्हटल तरी मुले होणार नाही.वैगेरे वैगेरे

घरात आईवडीलांची भांडणे होत असतात.पति-पत्नीची भांडणे होत असतात.भाऊ बहीणीची भांडणे होत आसतात.बाप लेकांची भांडणे होत असतात.आई-लेकीची भांडणे होत असतात.सासु-सुनेची भांडणे होत असतात.
आपल्या घरातील एकुण सदस्य असतात.त्याच्यामधे कधीतरी भांडणे होत असतात.अशा वेळी सहज न विचार करता.आपण वाईट शब्द वापरत असतो.

आपले घर म्हणजे" वास्तू " हया मधील वास्तूपुरूष तथास्तू म्हणत असतो.म्हणजे "तुझी जी मागणी आहे ती पुर्ण व्हावी."

सारखे सारखे घरात अपशब्द बोलले गेल्याने ,त्याशब्दाचा म्हणजे आपण आपणच वापरलेल्या शब्दाची फळे आपल्याला मिळायला सुरवात होते.घरातील व्यक्ती आजारी पडायला सुरवात होते.घरात अर्थिक सुबध्दता कमी कमी होत जाते..दारिद्र्य येण्यास सुरवात होते.काही जोडप्यां मध्ये काही कमीपणा मूळे मुले होत नाहीत.
हळुहळु समाजातील आपल्याला मिळणारा मानसम्मान कमी कमी होतो.दिवसे दिवसे हलाकिचे दिवस येण्यास सुरवात होते.
आपल्याला हेच समजत नाही असे .एक दोन वर्षात सर्व कसे बदली झाले.?आपला असा समज होतो कि आपल्यावर दैवी कोप झाला आहे आपल्यावरती कोणी करणीबाधा केली कि काय असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात

ह्याचे मुळ कारण आपणच आहोत हे आपणास उमगत नाही.आपण च हे दिवस मागून घेतलेले असतात. आपली वास्तूच प्रसन्न मनाने तुमची मागणी पुरी करीत असते.

जर आपण चांगले वागलो व बोललो असतो.चांगली मागणी केली असती तर आपली आणखी भरभराट झाली असती पण अजाणतेपणे केलेल्या कर्माची वाईट फळे आपणास विनाकारण मिळतात

म्हणून घरात नेहमी शुभ बोला आणि दुस-या बद्दल शुभ चिंतन करा

म्हणून आजपासून निश्चय करा व कोणीही घरात वाईट व अपशब्द बोलू नका रागआवरा शुभ बोला

*🙏🏻 jay jeevan vidhya🙏🏻*

No comments:

Post a Comment