Monday, 1 January 2018

शेती नांगर कविता

वावर

लय वरसांनंतर नांगर धरला हातामंदी
येक येक थेंब घामाचा पडला वावरामंदी

काळी आई भेगाळून विचारते कशी,
लेकरा, किती दिसांपास्न आहेस तू उपाशी?

आईचे हे ऐकून बोल मन माझं ओशाळलं
बांधाबांधावर जाऊन आठवणींमध्ये रमलं

तापलेल्या ढेकळांमंदी दुडुदुडु धावलं
आणि रापलेल्या तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं

सिमेंटच्या जंगलात आणि माणसांच्या गर्दीत
हरवलेला मी जगत होतो आपल्याच धुंदीत

शेतातल्या झोपडीची आणि भोळ्याभाबड्यांची
जागा घेऊ शकत नाही गर्दी सिमेंटच्या जंगलाची

शेतीमध्ये रमलेल्या मनाला सांगावं लागलं
उद्या आपल्याला परतीच्या प्रवासाला निघावं लागंल
उद्या आपल्याला परतीच्या प्रवासाला निघावं लागंल

                                       (कवी : संजय चव्हाण)
                                         

No comments:

Post a Comment