Tuesday, 13 February 2018

सुगी आली रे

सुगी आली रे !!.......

खुळुखुळु छुनुछुनु घुंगुर बोले
थिरकत पाऊल वाजे रे ऽऽ ,
थाप हलगिची सुरात बोले
दिस सुगिचे आले रेऽऽ !! ॥धृ ॥

खुशहाली ती शेत-शिवारी
मोदित नादे धुंद पावरी !
तुडुंब वाहे जलवंती , तो
पवन लकेरी घेई रे ऽऽ
दिस सुगिचे आले रे ऽऽ !!.......१

रानपाखरें किलबिल ओठी
इवल्या चोंची दाणा टिपती !
हिरवा राघू लोंबीवरती ,
खुशाल घेतो झोका रेऽऽ
दिस सुगिचे आले रे ऽऽ !!......२

चारा चरती सुखें वनचरें
केकावत वनी मोर नाचरें !
बळीराजाची तान सुगंधी
भलरीदादा भलरी रेऽऽ
दिस सुगिचे आले रेऽऽ !!.......३

दिन सोन्याचा , रात रुपेरी
समृद्धिचे पाऊल दारी !
कृपावंत तो निसर्गराजा
कृतार्थ हसतो गाली रे ऽऽ
दिस सुगिचे आले रे ऽऽ !!........४
   शुभ सकाळ सुगीची
💥💫🍁🕉साई राम जी🍁💫💥

No comments:

Post a Comment