लवंग
भारतीय स्वयंपाकघरातील दिव्यगंधी श्रीपुष्प
लवंग माझ्या सर्वात आवडत्या औषधांपैकी एक आहे ... आमचे कुठे नं कुठे दौरे चालूच असतात ... चिकित्सालयात आम्ही उपस्थित नसतो ....अशा वेळी कोणत्याहि रुग्णाचा अचानक फोन आला कि त्याला लवंग हे अत्यंत सहज मिळणारे आणि प्रभावी औषध म्हणून सांगता येते .
लवंग हि खरी तर त्या वनस्पतीच्या फुलाची वाळवलेली कळी आहे ... म्हणून लवंगकलिका हा शब्द लवंगेसाठी जास्त योग्य आहे ..
लवंग अनेक आजारात सहज वापरता येते ..
१) डोके दुखत असेल , सर्दी- पडसे होऊन सारख्या शिंका येत असतील तर लवंगेचा लेप कपाळावर लावावा.
२) दात किडून तोंडाला घाणेरडा वास सारखा येत असेल तर दिवसातून तीनदा लवंग चघळून ती गिळावी .
३) रात्रीचा खोकला खूप येत असेल तर दोन लवंगा दाढेत ठेवून त्यांचा रस गिळत राहावे ... हाच उपाय दम लागणाऱ्या व्यक्तीमध्ये पण फायदेशीर ठरतो .
४) लवंगाचे तेल जंतुनाशक असते .... कोल्हापूरला जिल्हा उपरुग्णालयात इंटरशिप करत असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा खूपच जास्त संपर्क आला होता.. तेव्हा आयुर्वेदातल्या एका गुरूंनी स्वाईन फ्लूची लस न घेता भीमसेनी कापूर आणि लवंग तेल यांचा एकत्र सुगंध दर अर्ध्या तासाने घ्यायला सांगितले होते ... परिणामी खूप विषाणूजन्य वातावरणात साधी सर्दी पण त्या काळात झाली नाही.
५) लवंगेचे तेल अत्यंत तीक्ष्ण असते.... सायटिका , कंबरदुखी , आमवात अशा वेदनादायक आजारात भीमसेनी कापूर मिसळून अभ्यंग केले कि वेदना कमी व्हायला खूप मदत होते .
६) तोंडाला सारखा कफाचा चिकटा येत असेल तर लवंग चघळावी ... तोंड लगेच स्वच्छ होते.
७) पोटात टोचल्यासारख्या वेदना होऊन उलट्या होत असतील तर पाच सहा लवंगा उकळून त्याचा चहा करून देतात.
८) क्षय रोगी व्यक्ती खोकल्यावर आणि कफ पडल्यावर भयंकर घाणेरडी दुगंधी येते ती कमी व्हावी यासाठी लवंग चघळणे फायदेशीर आहे .
९) गर्भिणी बाईला उलट्या होत असतील तर लवंग आणि मध यांचे चाटण द्यावे.
१०) बाळंत झाल्यावर आईला दुध वाढावे आणि ते शुद्ध असावे यासाठी शतावरी कल्प सोबत लवंगेचे चूर्ण द्यावे.
११) शीघ्रपतन साठी जी औषधे योजली जातात त्या योगांमध्ये लवंग वापरली तर शीघ्रपतनाचा त्रास कमी होतो .
१२) ताप आल्यावर आपण तुळशीच्या पानांचा काढा करतो त्यात दोन लवंग कुटून घातल्या कि ताप लवकर उतरून रुग्णाला हलके वाटते.
लवंग अशीच त्वरित गुण देणारी दिव्य आहे ...तिच्याबद्दल लिहावे तितके कमीच.
लवंगाचे औषधी गुणधर्म
लवंग हे मसाल्याच्या पदार्था मधील महत्वाचा पदार्थ मानला जातो. लवंगाने पदार्थाला सुंगंध येतो. लवंग हे मुखशुद्धी साठी सुद्धा उपयोग केला जातो. तसेच लवंगाचा औषधी बनवण्या साठी अथवा घरात औषध म्हणून सुद्धा उपयोग केला जातो.
लवंग ही दोन प्रकरची असतात. एक काळ्या रंगाची जी खूप तीव्र सुगंधी असतात ती खरी लवंग ओळखली जातात व ती उत्तम प्रतीची समजली जातात. दुसरी म्हणजे भुरकट रंगाची असतात त्यामधील तेल यंत्रा द्वारे काढून घेतले जाते. लवंगामुळे पदार्थाला चव येते. भात बनवतांना फोडणी मध्ये लवंग घातले जाते त्यामुळे भात स्वदिस्ट लागतो.
लवंगा मधून काढलेले तेल खूप औषधी आहे. हे तेल बरीच औषध बनवण्यासाठी उपयोगी पडते. तसेच ते जंतुनाशक सुद्धा आहे.
प्रवासामध्ये मळमळ होत असेल, उलटी येत असेल तर प्रवास करतांना तोंडामध्ये लवंग ठेवावे. दात दुखी साठी लवंग खूप उपयोगी आहे.
लवंग हे तिखट, कडवट,थंड, पाचक, रुची निर्माण करणारे,कफ, उचकी व क्षय रोगावर गुणकारी आहे.
खोकल्याची उबळ येत असेल तर लवंग तोंडात ठेवावे. त्यामुळे सर्दी सुद्धा कमी होते. बऱ्याच प्रमाणात सर्दी झाली असेल तर पाण्यात दोन लवंग घालून पाणी उकळून प्यावे.
लवंगाचे तेल डोक्यावर चोळल्याने डोकेदुखी कमी होते. जर सांधेदुखी होत असेल तर लवंगाचे तेल चोळावे म्हणजे सांधेदुखी कमी होते. लवंगाच्या तेलाचे थेंब रुमालावर घालून मग हुंगावे म्हणजे सर्दी कमी होते.
दात दुखत असेल तर लवंगाचे तेलाचे २-३ थेंब कापसावर घालून हा कापूस दुखत असलेल्या दातावर ठेवावा दात दुखायचा बंद होतो.
लवंग किती गुणकारी आहे ते आपल्याला समजले.
No comments:
Post a Comment