Saturday, 24 February 2018

घराची उपयुक्त माहिती

🌹 || श्री स्वामी समर्थ || 🌹

उपयोगी माहिती 👌

1) घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडा.
गोमूत्र शिंपडताना 'अपवित्रा: पवित्रोवा सर्वावस्था गतोपिवा, यः स्मरेत्पुण्डरिकाक्षं सः बाह्याभन्तरः शुचि' या मंत्राचा मोठ्याने उच्चार करावा. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ घाला. घराच्या कोपर्‍यात काचेच्या किंवा मातीच्या वाड्ग्यात खडेमीठ भरुन ठेवा. खराब झाल्यावर लगेच बदला.

२) घरात अपशब्द उच्चारु नका. सजीवांप्रमाणेच वास्तूला पण चेतना असते. घरात उचारल्या जाणार्‍या सर्व इच्छांना वास्तू तथास्तु म्हणत असते. अगदी रागाच्या भरातही लहान मुलांसाठीही घरात अपशब्द वापरु नका.

३) दरवाज्यासमोर दररोज रांगोळी काढा. पांढरी रांगोळी घालणार असेल तर त्यावर हळद कुंकू टाका. किंवा रांगोळीत आधीच हळद कुंकू मिसळून त्याने रांगोळी काढा. रांगोळी काढायचा कंटाळा आला असेल तर ऑईलपेंटने रांगोळी काढणे किंवा ओल्या कुंकवाने रांगोळी काढणे ई. प्रकार अज्जिबात करु नका.

४) दररोज सकाळी उंबरठा धुवावा. शक्य झाल्यास त्यावरही गोमूत्र शिंपडावे. त्यावेळीही वर दिलेल्या मंत्राचा मोठ्या आवाजात उच्चार करावा. उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे.

५) महत्वाच्या कामाला जाताना घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ओल्या कापडाने पुसावा.

६) दारासमोर सणासुदीला कल्याणकारी स्वास्तिके काढावीत. उंबरठ्यावर विड्याच्या पानावर अक्षता, नाणं व सुपारी ठेवावी.

७) घरात दररोज किमान दोन वेळा धूप जाळावा. उदबत्ती आणि कापूरही पेटवावे.

८) घरात पाटावर मंगल कलशाची स्थापना करावी.

९) संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ महत्वाची आहे. तिचे पावित्र्य राखा. शास्त्रकारांनी ही वेळ दिवाबत्तीची सांगितली आहे. विद्यार्थांनी या वेळेत संध्या करावी. संध्या जमत नसेल तर प्राणायम करावे. जेणेकरुन एकाग्रशक्ती वाढेल. आयुर्वेदात या वेळेचा उल्लेख 'प्रज्ञापराध' असा करण्यात आला आहे. या वेळेत शक्यतो अभ्यास करणं टाळावं. घन पदार्थ खाणे शक्यतो टाळावं. या वेळेत रडारडीची सिरीअल्स लावू नये.

१०) निरुपयोगी वस्तूंचा संचय करु नये. घरातील अडगळ ताबडतोब फेकून द्या.

११) काही दिवस घराबाहेर जाणार असाल तर घरात झिरोचा बल्ब पेटता ठेवावा.

१२) घरात 'रत्नाध्याय' करुन घ्या. यात नऊ रत्नं आणि स्वस्तिक यंत्र घरात निरनिराळ्या ठिकाणी विधीवत निक्षेप केली जातात. ग्रहांच्या शुभ लहरी घरात खेचून वैश्विक उर्जेचे संतुलन आणि संवहन करणारा आणि त्वरित्च फलदायी ठरणारा याच्यासारखा अन्य उपाय नाही. मात्र हा वास्तुशास्त्राच्या निष्णात अभ्यासकाकडूनच घेतला पाहिजे.

१३) चांदीचं निरांजन लावून (गाईच्या तुपाचे) घराच्या आग्नेय कोपर्‍यात दररोज सकाळी ९ ते ११ या वेळात ठेवत जावे. सकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्वेला उगवणारा सूर्य साधारणपणे नऊच्या सुमारास पूर्व आग्नेयेला पोहचतो. यावेळात चांदीचे निरांजन तेथे ठेवल्यास चंद्रप्रवाहाचं (चांदीचं) संस्करण झालेल्या, आणि गायीच्या तूपामुळे शीतल अश्या प्रकाश लहरी, त्यानंतर यमस्वरुपात जाणार्‍या सूर्यकिरणांना नियंत्रित ठेवतात. घरातील ब्रम्हांड लहरी तप्त होऊ न देणं गरजेचं आहे. ते काम हे चांदीच उजळलेलं निरांजन करते.

१४) घरात फारच कटकटी होत असतील तर समईच्या तळाच्या गोलात शुभे छोटे शंख ठेवा. साजुक तुपाची निवळी व राईचे तेल याने समई प्रज्वलित करा. शंखातून प्रस्फुटित होणारा शंखाच नाद आणि समईच्या प्रकाश लहरी यांच्या संयोगाने ब्रम्हांड्लहरींना चालना मिळेल.

१५) पूजेच्या वेळी घंटानाद करा. घराच्या प्रत्येक कोपर्‍यात घंटानाद करणं गरजेचं आहे. अडगळीच्या ठिकाणी अधिक वेळ घंटानाद करा. घंटा वाजवताना "आगमनार्थ तू देवानाम्
गमनार्थ तू राक्षसम्, कुर्वे घण्टारव तत्र देवता आल्हादकारम्" हा मंत्र मोठ्या आवाजात म्हणा.
घंटानाद आणि शंखनाद यांचा त्रास अशुभ उर्जेला होतो. शंखनाद हा मंगलध्वनी आहे. जमल्यास दररोज शंखनादही करावा.

१६) घरात अपमृत्यू झाल्यास उदकशांती किंवा अपमार्जन विधी करुन घ्यावा.

१७) शुभ ब्रम्हांड्लहरींसाठी 'रत्नाध्याय' याशिवाय 'लघुअग्निहोत्र' हाही एक चांगला उपाय आहे. मात्र रत्नाध्याय एकदाच करावा लागतो व लघुअग्निहोत्र दररोज करावा लागतो. यामुळे वातावरण प्रदूषणमुक्त होतं. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी हा लघुअग्निहोत्र केला जातो. विशिष्ट आकाराचं होमाचं पात्र, गाय किंवा बैलाच्या शेणापासून तयार केलेल्या गोवर्‍या, अखंड तांदूळ, गाईचं तूप, अग्नि प्रज्वलनासाठी धूप, कापूर, फुलवाती असं साहित्य लागते. सूर्यास्ताच्या वेळेपूर्वी अग्निकुंडात गोवर्‍या टाकून अग्नि प्रज्वलित करावा. दोन चिमूट अखंड तांदळांना गाईचे तूप लावून दोन आहुती तयर ठेवाव्यात. बरोबर सूर्यास्ताची वेळ होताच पुढे दिलेले मंत्र म्हणून आहुती अग्नीत सोडाव्यात.
"अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम" (पहिली आहुती)
"प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम" (दुसरी आहुती)
सूर्योदयाच्या वेळी करत असाल तर
"सूर्याय स्वाहा सूर्याय इदं न मम" (पहिली आहुती)
"प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम' (दुसरी आहुती)
आहुती भस्म होईपर्यंत शांत बसावं. दोन मिनिटात आहुती भस्म होते.
अग्नी प्रज्वलित करण्यासाठी रॉकेल, डिझेल ईत्यादी खनिजं ईंधन वापरु नयेत.
अग्निकुंडात गोवर्‍या अश्या रचाव्या की निर्धूर अग्नि पेटावा. तांब्याचं अग्निपात्र उलट्या पिरॅमिडच्या आकारचं असतं. गोवर्‍याऐवजी यज्ञीय समिधा वापरल्या तरी चालतील. वड, पिंपळ, उंबर, बेल आणि पळस हे पाच यज्ञीय वृक्ष आहेत. त्यांच्याच समिधा वापराव्यात.

🌸 !! शुभम् भवतु !! 🌸

🌹 || श्री स्वामी समर्थ || 🌹

No comments:

Post a Comment