CRR AND SLR
बँकांचे व्यवहार हे जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि त्या गरज असेल त्यांना कर्जरुपाने वाटणे असे चालतात. ठेवींवर कमी तर कर्जावर अधिक व्याज असते यातूनच बँकेस नफा होतो. बँकांचे सर्व व्यवहारांवर RBI चे नियंत्रण असते. बँकांनी RBI ने आखून दिलेल्या नियामावलीचे पालन करूनच व्यवहार केले पाहिजेत असे बंधनकारक असते. या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई केली जाते.
बँकेकडे आलेल्या ठेवी या सुरक्षित ठेवण्यासाठी RBI ने काही नियम बनवले आहेत. ठेवींची पूर्तता किंवा गरज पडल्यास मुदतपूर्व ठेवी गुंतावणूकदाराने मागणी केल्यास व्याजासाहित ठरलेप्रमाणे रक्कम परत करणे बँकांना बंधनकारक आहे. याची खबरदारी म्हणून RBI ने नियमांचा एक भाग म्हणून बँकांनी काही गुणोत्तर पाळणे बंधनकारक असते. त्यापैकी CRR आणि SLR हे दोन रेशोज/ गुणोत्तर सांभाळणे बँकांना बंधनकारक आहेत.
काय आहेत CRR आणि SLR? – WHAT IS CRR AND SLR?
CRR आणि SLR चे चालू दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. – RBI च्या वेबसाईटवर current rates या विभागामध्ये चालू दर दिलेले आहेत.
CRR – cash reserve ratio रोख राखीव प्रमाण:
बँकाकडे असलेल्या ठेवींच्या एकूण रकमेच्या काही रक्कम ही रोख स्वरुपात ठेवावी लागते त्या प्रमाणास रोख राखीव प्रमाण किंवा CRR (Cash Reserve Ratio) असे म्हणतात. सध्या CRR चे प्रमाण 4% आहे. याचा अर्थ बँकांनी स्वीकारलेल्या आणि मागणी असलेल्या एकूण रकमेपैकी 4% रक्कम हि रोख स्वरूपात किंवा रोख सदृश स्वरूपात ठेवणे बंधनकारक आहे.
SLR – statutory liquidity ratio वैधानिक रोखता प्रमाण:
बँकांनी स्वीकारलेल्या ठेवी आणि मागणी असलेल्या एकूण रकमेपैकी काही रोख स्वरूपात किंवा रोख सदृश स्वरूपात (मान्यताप्राप्त सरकारी प्रतिभूती) ठेवणे. या प्रमाणास वैधानिक रोखता प्रमाण किंवा SLR – statutory liquidity ratio असे म्हणतात. सध्या SLR चे प्रमाण 20.75% आहे. याचा अर्थ बँकांनी स्वीकारलेल्या आणि मागणी असलेल्या एकूण रकमेपैकी 20.75% रक्कम हि रोख स्वरूपात किंवा रोख सदृश स्वरूपात (सरकारी प्रतिभूती, सोने इत्यादी) ठेवणे बंधनकारक आहे.
वरील दोन्ही प्रमाणांनी बँकेची रोखता सांभाळणे सोपे जाते. तसेच बँकांनाही ही रक्कम अचानक गरज पडल्यास वापरता येते. CRR 4% आणि SLR 20.75% ची मिळून असलेली 24.75% रक्कम बाजूला काढून बाकीची रक्कम कर्ज वाटप आणि इतर गोष्टींसाठी वापरली जाते.
CRR आणि SLR चे प्रमाण सांभाळणे बँकांना बंधनकारक आहे. बँकांना दिवसभराचे व्यवहार संपले की हे प्रमाण पडताळून बघावे लागते. हे प्रमाण सांभाळणे खूप जीकरीचे असते. काही कारणस्तव हे प्रमाण बिघडल्यास (ग्राहकांकडून जास्त प्रमाणात रक्कम काढणे) ते त्वरित सुधारण्यात यावे अशी अपेक्षा असते. हे प्रमाण वेळीच न सुधारले गेल्यास बँकांना RBI कडून ताकीद दिली जाते आणि पुढे जाऊन दंडात्मक कारवाई केली जाते.
CRR – CASH RESERVE RATIO – रोख राखीव प्रमाण – ४% आणि SLR – STATUTORY LIQUIDITY RATIO – वैधानिक रोखता प्रमाण – २०.७५%
CRR आणि SLR चे प्रमाण कसे राखले जाते?
काही कारणस्तव CRR आणि SLR चे प्रमाण बिघडले गेले तर त्यासाठी खालील उपाययोजना केल्या जातात.
Call Market Money किंवा मागणी पैसा देय बाजार या कामी महत्वाची भूमिका बजावतो. अल्प काळासाठी मागणी पैसा देय बाजारातून कर्ज घेतले जाते व CRR आणि SLR चे प्रमाण संतुलित केले जाते. याविषयी अधिक वाचा.
Collateralised Borrowing and Lending Obligation (CBLO): clearing corporation of India च्या CBLO Dealing system च्या सहाय्याने पैशांची गरज असलेल्या बँका आणि अधिक पैसा असलेल्या बँका आपापसात व्यवहार (देणे – घेणे) करतात आणि आपली तात्पुरती गरज भागवतात. १ दिवस ते १ वर्ष या कालावधी साठी पैसा दिला किंवा घेतला जातो. या व्यवहारासाठी CBLO चे सभासद असणे आवश्यक असते.
रेपो (REPO- Re Purchase Option) : बँकाकडून RBI काही प्रतिभूती खरेदी करते व पैसे देते आणि ह्याच प्रतिभूती पुन्हा खरेदी करण्याचे करार केला जातो. यातून बँकांना रोख रक्कम प्राप्त होते. हा व्यवहार अल्प काळासाठी असतो शिवाय बाजारातील रोखताही सांभाळली जाते. याविषयी अधिक वाचा.
No comments:
Post a Comment