परमेश्वर प्रथमेशा
गजानन जगदीशा
नमितो तुज आदी देवा
हृदयांच्या हे नरेशा
एकदंत लंबोदर ,
कटीस शुभ पितांबर
अति पावन, अति सुंदर ,
तव स्वरूप हे गणेशा
विघ्नेश्वर तू विधाता
अनुरागी तू अनंता
करुणाकर तू कृपाळा
वरदरूप विद्याधीशा
🌺 🙏🏻श्री गणेशायनमः🙏🏻🌺 🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🌺
No comments:
Post a Comment