Thursday, 1 November 2018

नदीकिनारी चंचल पक्षी

नदीकिनारी चंचल पक्षी निळसर त्याची काया
निळसर पाणी, निळसर अंबर, शामलसुंदर छाया
त्या पक्ष्याचे गहिरे डोळे भरून घेतो सागर
दृष्ट टाळण्या त्या डोळ्यांना कोण लावते काजळ?

पैलतटावर एक गुराखी निळाच त्याचा शेला
वा-यामधले शब्द गुंफतो घुमू लागतो पावा
क्षितिजावरही रंग उमटतो सांजेचा तो पाया
भरल्या डोही दाटत आहे निळी नव्हाळी माया

निरोप घेती जरी पावले मन हे मागे उरते
अवतीभवती एक रितेपण सांज विराणी गाते
पुन्हा पुन्हा का वळून बघते साद घालती कोणी
माहित असते क्षण हे सारे अळवावरचे पाणी

               - श्रद्धा अभंग.

No comments:

Post a Comment