सुंदर ते ध्यान पहा जाऊनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || धृ ||
कर ठेवुनी कटेवरी, उभा आहे विटेवरी
कानी कुंडल मकराकार, गळा शोभे तुळशीहार
कौस्तुभ मनीविराज, कंठी दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || १ ||
विठू उभा ना बैसला, जिकडे तिकडे दाटीयेला
चराचर व्यापून सारे, विटेवर उभा राहिला
नेसला तो पितांबर दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || २ ||
सत्यानंद म्हणे विठ्ठला, डोळे भरुनी पहिले तुजला
अंतर्भाह्य तोची भरला, कुठे नाही जागा उरला
विठ्ठल दर्शनाने पंढरी, दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी ||
No comments:
Post a Comment