Saturday, 10 November 2018

मोरगावचा मयुरेश्वर

मोरगावचा मयुरेश्वर

अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो.
येथील मूर्ती अतिशय नयनमनोहर आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी - सिद्धी आहेत.

श्रींच्या मूर्तीची एक अख्यायिका सांगितली जाते, मूर्तीच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात लोह आणि रत्नाच्या अणूंपासून मोरेश्वराची मूर्ती बनविलेली आहे. तिची प्रथम स्थापना ब्रम्हदेवाने केली होती. सिंधू दैत्याने दोनवेळा त्या मूर्तीचा विध्वंस केला. मात्र, ब्रम्हदेवाने तिची पुनःप्रतिष्ठापणा केली. त्यानंतर द्वापारयुगात पांडव भूस्वानंद क्षेत्री आले आणि त्यांनी मूळ मूर्तीला काही होऊ नये म्हणून तांब्याच्या पत्र्याने आच्छादित करून नियमीत पुजेसाठी सध्याच्या मूर्तीची स्थापना केली.

मोरगावला जाण्याचा मार्ग

मोरगाव  पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. तर, बारामतीपासून 35 किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी पुण्याहून एस.टी.बस आहे.

No comments:

Post a Comment