Sunday, 11 November 2018

अष्टविनायक वर्णन

निर्गुण सगुण प्राणवाकृती ।एक असे हा गणपतिरक्षावया भक्तांप्रती ।अष्टस्थानी प्रकटला ।। १ ।।

मयूरक्षेत्री उध्दरिला कमलासुर ।सिध्दीटेकी हरिने तप केले घोर ।बल्लाळचा केला उध्दार |मुरुड क्ष्रेत्री प्रकटोनी ।। २ ।।

महड क्ष्रेत्री विनायक lप्रकटोनिया भक्तपालक ।दुष्ट दानव वधोनी सकळीक ।मुनी द्विजांशी रक्षिले ।। ३ ।।

विधीने तप करिता स्थावर भुवनी ।तेथे प्रकटला चिंतामणी ।भ्रांती गेली नीरसोनी ।स्वसामर्थ्यासी लाधला ।। ४ ।।

लेन्यान्द्री दिव्या पर्वंती ।पार्वत्यात्मज झाला श्रीगणपति ।दानव मर्दोनी पापमती ।रक्षण केले नगजेथें ।। ५ ।।

ओझर क्ष्रेत्री विघ्नहर ।प्रकट झाला सर्वेश्वर ।भक्तांची संकटे केली दूर ।समूळ विघ्ने वारुनी ।। ६ ।।

रांजणगावी श्री गणपति ।प्रगट झाली श्री ब्रह्ममूर्ती ।आश्वासुनी सुरांप्रती ।स्थापिले स्वपदी सर्वांते ।। ७ ।।

No comments:

Post a Comment