Wednesday, 19 October 2016

एकदंत चतुर्हस्तं अर्थ सहित

🌺गणेश अर्थ वर्षीश अर्था सहित🌺
एकदन्तञ् चतुर्हस्तम्, पाशमङ्कुशधारिणम् ।
रदञ् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम्, मूषकध्वजम् ।
रक्तं लम्बोदरं, शूर्पकर्णकम् रक्तवाससम् ।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्, रक्तपुष्पैःसुपूजितम् ।
भक्तानुकम्पिनन् देवञ्, जगत्कारणमच्युतम् ।
आविर्भूतञ् च सृष्ट्यादौ, प्रकृतेः पुरुषात्परम् ।
एवन् ध्यायति यो नित्यं
स योगी योगिनां वरः ।। ९ ।।
🌺प्रेरणा श्रीराम स्वामी समर्थ तुकोबा माउली 🌺
✒लेखिका तृप्ति पाटिल✒
ह्या श्लोकात अर्थव ऋषि गणेशाचे वर्णन करतात की गणेश देवता ही खुप सूंदर बुद्धिचि देवता आहे. गणेशाचा रंग लाल आहे. एकच उजवा दांत आहे. चार हात आहेत. उजवा हातात पाश तर डाव्या हातात अंकुश घेतले आहे.डाव्या बाजूला हत्तीचा दांत आहे. उजव्या हातात वरदमुद्रा धारण केलि आहे. उंदीर ह्याचे वाहन आहे असा गजमुख रक्तसारख्या लाल रंगाचा हां लंबोदर आहे.ज्याचे कान सुपासारखे मोठे मोठे आहेत. गणेश देवाने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे.लाल रंगाचे कपालाला गंध लावला आहे. ती ही रक्त चंदनाची आहे. ही उटी पूर्ण अंगाला लावलेली आहे.लाल रंगाचे जास्वंदिचे फुलाने गणपतीची पूजा केलि जाते.असा हां आपला देव गणेश आहे. भक्ताना सांभाळणारा भक्तांच्या हाकेला लगेच धावनारा. सर्व जगाला आपली लीला दाखविनारा. श्रुष्टीचा जो पालनकर्ता श्रुष्टीचा नियंता म्हणजेच ब्रह्मा विष्णु महेशाचे रूप रुद्राचा अवतार गणेश आहे. प्रकृति च्या पलीकडे ज्याचे वैभव आहे असा श्री गणेश. ह्याची जो योगी नेहमी पूजा करतो. त्याला गणेशाचे कृपाछत्र नेहमी मिळते. त्या भक्ताचा तो पालनकर्ता होतो. अश्या ह्या गणेश देवतेचे स्वरुप अर्थव ऋषींनी सांगितले आहे. अश्या देवतेला नमस्कार असो.
🌺सद्गुरुपर्णामस्तु तुकोबा माउली🌺

No comments:

Post a Comment