Saturday, 22 October 2016
गदिमा कृत मराठी अथर्वशीर्ष
गदिमाकृत मराठी अथर्वशीर्ष।
गदिमाकृत मराठी अथर्वशीर्ष। 'त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि' असं गणपतीबाप्पाच्या महान स्वरूपाचं खरंखुरं तत्त्वज्ञान समजावून सांगणारं प्रसिद् ध गान म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. अनेक घरांत ते आवर्जून गायलं जातं. अनेक ठिकाणी त्याचं सामूहिक आवर्तनंही होतात. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांनी त्याचं मराठीत रसाळ ओवीबद्ध अनुवाद केलाय,
ॐ भदंकणेर्भि: शृणुयाम देवा: भदं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं (देवहितैं) यदायु: ।।
ॐ स्वस्ति न इंदो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:। स्वस्ति नस्ताक्षोर् अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
ॐ शांति: शांति: शांति: ।
शुभ तेंचि पडावें कानीं । शुभदचि देखावें लोचनी ।
जीवन जावो भजनी चिंतनी । ऐसे करा देव हो ।।
वडिलांचेहि वाडवडिलीं । ज्याची कीतिर् गाजवली
तो देवेन्द महाबळी । कल्याण करो आमुचें ।।
संपन्न आणि सर्वज्ञ । पूषा करो तो कल्याण।
तार्क्ष्य अकुंठित गतिमान । स्वस्तिदान करो आम्हां ।।
वेदजयाची छायाकृति । देवगुरू तो बृहस्पति।
कल्याण दाता आम्हांप्रति । होवो सदा सर्वदा ।।
होवो मजलागीं सांभाळता । होवो मग गुरुते रक्षिता।
वेदपाठका अभयदाता । कल्याणकारी उभयांसी ।।
हरि ॐ । नमस्ते गणपतये ।। त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि ।। त्वमेव केवलम् कर्तासि ।। त्वमेव केवलम् धर्तासि ।। त्वमेव केवलं हर्तासि ।। त्वमेव सर्वम् खल्विदम् ब्रह्माासि ।। त्वं साक्षादात्मासि नित्यम् ।। १ ।।
ऋतं वच्मि ।। सत्यं ( सत्यौं ) वच्मि ।। २ ।।
अव त्वं माम ।। अव वक्तारं ।। अव श्रोतारं ।। अव दातारं ।। अव धातारं ।। अवानूचानमव शिष्यम् ।। अव पश्चात्तात् ।। अव पुरस्तात् ।। अवोत्तरात्तात् ।। अव दक्षिणात्तात् ।। अव चोर्ध्वात्तात् ।। अवाधरात्तात् ।। सर्वतो मां पाहि पाहि समंतात् ।। ३।।
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: ।। त्वमानंदमयस्त्वं ब्रह्मामय: ।। त्वं ( त्वौं ) सच्चिदानंदाद्वितीयोसि ।। त्वं ( त्वौं ) प्रत्यक्षं ब्रह्मासि ।। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ।। ४।।
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ।। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।। सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।। सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।। त्वं भूमिरापोनलोनिलो नभ: ।। त्वं चत्वारि वाक्पदानि ।। ५ ।। ॐ नमोजी गजानना । मंगलमूर्ते सिंदुरवदना
करितां तुझिया चरणस्मरणा । विघ्नराशी नासती ।।
भास्कराचिये उदयकाळीं । सरे जैसी रात्र काळी
तैसी संकटांची मांदियाळी । तव स्मरणे लोपते ।।
जय जय देवा प्रसन्नमुखा । एकदंता गजकर्णका
विकटरूपा विघ्ननाशका । गणाधिपा गजानना ।।
जय जय देवा कपिला । भालचंदा भक्तवत्सला
सर्वमूला महन्मंगला । गणाध्यक्षा गणपते ।।
देवा तुझी नामावळी । जे जे जपती संकटकाळी
विद्यारंभी विवाहवेळी । शुभारंभी कार्याच्या ।।
तयासी न पडे सांकडें । इच्छित तोचि लाभ घडे
तुझिया नामाचे पवाडे । तीन्ही लोकीं गाजती ।।
शुक्लांबरा शिवात्मजा । मंगलवर्णा चतुर्भुजा
करितों तुझी मानसपूजा । दूर्वाक्षरें वाहुनी ।।
ॐ नमिला गणपती । माता वंदिली सरस्वती
मायामूढ मी अल्पमती । गणेश गौरव गाईन ।।
मोरगांवीं मोरेश्वर । जयें वधिला कमलासूर
त्यासी करुनी नमस्कार । अष्टतीथेर् आठवितों ।।
सिद्धटेकीं विनायक । सिद्धिदाता विघ्ननाशक
विष्णूहि ज्याचा पूजक । त्यासि वंदन आदरे ।।
पालीचा बल्लाळेश्वर । शमीतळीं शिवकुमार
अज्ञभक्तांचा कैवार । तोच घेईल सर्वदा ।।
महडगांवीं वरदमूर्ति । करी कामनांची पूर्ती
गृत्समदें केली कीतिर् । गणानां त्वां गणपतीम् ।।
थेऊरगांवीं चिंतामणि । देवेन्दा जो वरदपाणि
गौतमाची शापवाणी । ज्याच्या कृपे आटली ।।
लेण्यादिच्या कडेकपारीं । गिरिजात्मज तो वास करी
मातेसाठी गिरिकुहरीं । पाथिर्व देवत्व पावलें ।।
ओझरगांवीं विघ्नेश्वर । जयें मारिला विघ्नासुर
तो मी नमिला रूपसुंदर । पिंगलाक्ष गजानन ।।
रांजणगांवी गणपती । यशद झाला पित्याप्रती
त्रिपुराची करी समाप्ती । शिव ज्याच्या प्रभावे ।।
महाराष्ट्री अष्टविनायक । त्यांचे पायीं नतमस्तक
होऊनिया ग्रंथलेखक । देशभाषा बोलतो ।।
त्वं गुणत्रयातीत: ।। त्वं देहत्रयातीत: ।। त्वं कालत्रयातीत: ।। त्वं मूलाधारस्थितोसि नित्यम् ।। त्वं
(त्वौं) शक्तित्रयात्मक: ।। त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।।
तूं तो ओंकार साकार । अखिल विश्वाचा आधार
मूल तत्त्व निराकार । तोहि तूंची गणेशा ।।
तूंच या विश्वाचा निर्माता । तूंच कर्ता चालविता
तूंच अंति लयकर्ता । त्रिगुणांची मूर्त तूं ।।
निर्गुण अथवा सगुण । तया मुळीचें ब्रह्मापण
तें हि साक्षात् श्रीगजानन । नि:संदेह बोलतो ।। दृश्य जगतीचे चेतन । आत्मरूप कानडे गहन
तें हि प्रत्यक्ष श्रीगजानन । अनंत आणि निरंतर ।।
माझें बोलणें व्यावहारिक । जें आधीचेंच सत्य सात्त्विक
त्याचें प्रवचन प्रामाणिक । तुज पुढती मांडितो ।।
अभय असो मज वक्त्यासी। अभय असो गा श्रोत्यासी
अभय असो गा दात्यासी । परोपकारी सज्जनां ।।
जे जे या त्रिजगतीं । ब्रह्माविद्या संपादिती
तयांच्या राहोनी मागें पुढती । रक्षी देवा गणेशा ।।
वाम अथवा दक्षिणदिशीं । अंतराळी वा भूप्रदेशीं
जेथून उगम संकटांशीं । तेथें उभा ऐस तूं ।।
वेदशास्त्रादि वाङमय । तोहि तुझाचि रूपप्रत्यय
शब्दातीत वा अव्यय । ते ही तुझीच गुणव्याप्ती ।।
नामरूपाचा अहंभाव । धरोनी नांदे जड जीव
तयाचाहि होई संभव । तुझिया रूपी अनंता ।।
तूं अविनाशी चैतन्यमय । आनंदरूपी आनंदमय
साक्षात ब्रह्मा जे अद्वितीय । आदितत्त्व तूंचि ते ।।
त्वं ब्रह्मा ।। त्वं विष्णुस्त्वं रुदस्त्वमिंन्दस्त्वमग्निस्त्वं ( त्वौं ) वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंदमास्त्वं ब्रह्मा भूर्भुव: स्वरोम् ।। ६।।
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् ।। अनुस्वार: परतर: ।।
तूंचि ब्रह्मा ब्रह्माज्ञान । तूंच माया आणि विज्ञान
भौतिकाचेही अधिष्ठान । तुझिया रूपीं गोंवलें ।।
सृष्टि तुझिया मधुनी उपजे । तुझिया मुळेंच माया सजे
तुझिया ठायींच अंतीं थिजे । ऐसे वेदांत बोलतो ।।
तूंच पृथ्वी आणि आकाश । वायु , वारि वा प्रकाश
अवघ्या भूतांचा आवेश । तव चैतन्य निमिर्ते ।।
परा , पश्यंती , वैखरी । मध्यमेसह वाणी चारी
त्याहि तुझिया निराकारी । आकारती गणेशा ।।
जें सत्त्व , रज , तमांकित । तूं तयाच्या न अंकित
तिन्ही वेगळा त्रिगुणातीत । सर्व सर्वापार तूं ।।
स्थूल , सूक्ष्म आणि कारण । तया वेगळा देहहीन
भूत , भविष्य , वर्तमान । यांच्या पैलाड ठाकसी ।।
मानवदेहीं , मूलाधार । चक्र जें निराकार ।
तेथें तुझा आविष्कार । नित्य वास्तव्य नांदते ।।
जनन , रक्षण , संहरण । तिन्हींचें तू अधिष्ठान
योगी करिती तुझेंच ध्यान । स्वसंवेद्य आद्य तूं ।।
विष्णु करी जगरक्षण । रुद करितो संहरण
तया देवतांचे एकपण । तुझिया अंगी जागतें ।।
इंद देवांचा राज्यकर्ता । अग्नि यज्ञाचा हव्यभोक्ता
वायु वाहता , प्राणदाता । सारी रूपे तुझीच ती ।।
प्रकाशदाता श्रीभास्कर । चंद औषधींचा ईश्वर तया उभयतांचे सहस्त्रकर । तेजोवलये तुझिच तीं ।।
ब्रह्मालोक वा भूस्थल । अंतरिक्ष वा स्वर्गलोक थोर
प्रणवाक्षर की ओंकार । तोहि तूची समर्था ।।
अर्धेंर्दुलसितम् ।। तारेण रुद्धम् ।। एतत्तव मनुस्वरूपम् ।। गकार: पूर्वरूपम् ।। अकारो मध्यमरूपम् ।। अनुस्वारश्चांत्यरूपम् ।। बिंदुरुत्तररूपम् ।। नाद: संधानम् ।। संहिता ( सौंहिता) संधि: ।। सैषा गणेशविद्या ।। गणक ऋषि: ।। निचृद्गायत्रीच्छंद: गणपतीदेर्वता ।। ॐ गं गणपतये नम: ।। ७।। एकदंताय विद्महे ।। वक्रतुंडाय धीमहि ।। तन्नो दंति: प्रचोदयात् ।।
ग वर्णाचा करुनी उच्चार । त्यात मिसळावा अ कार स्वर
अर्धेंदुवत अनुस्वार । तत्संगती बोलावा ।।
मग होईल पूणोर्च्चार । मूलाधार जें प्रणवाक्षर
सवर्ण नाद जो ओंकार । रूपमांगल्य तें तुझें ।।
प्रारंभरूप तो ग कार । मध्यम रूप तो अ कार
अंत्यरूप अनुस्वार । बिंदु उत्तर रूप तें ।।
या सर्वांचा एकत्रित नाद । स्वरास्वरांचा सुसंवाद
तोचि अनादि ब्रह्मानाद । ओंकार मंगल बोलीजे ।।
हाचि तुझा नाममंत्र । हाचि प्रसिद्ध सर्वत्र
हा उच्चारितां अहोरात्र । मुक्ति पायीं लोळतें ।।
या मंत्राच्या सार्मथ्याशी । दष्टा झाला गणकऋषी
निचृत् गायत्री छंदांशी । भूषविलें मंत्राने ।।
ॐ गं गणपतये नम: । हाच मंत्र मंत्रमहिमा
याच्या शक्तीस ना सीमा । अष्टाक्षरी मोक्ष या ।।
एकदंताचे महात्म्य । मियां जाणिलें निश्चित
वक्रतुंड झाला ज्ञात । त्यासी घ्यातो अहनिर्शी ।।
मज साधनक्रियमाणां । श्रीगणेश देवो प्रेरणा
ही गणेशगायत्री जाणा । वाराणसी मंत्रांची ।।
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ।। रदं च वरदं ( वरदौं ) हस्तैबिर्भ्राणं मूषकध्वजम् ।। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकम् रक्तवाससं ।। रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ।। भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।। आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात्परम् ।। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: ।। ८ ।।
नमो व्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नम: ।। ९ ।।
चतुर्भुज आणि एकदंत । आयुधें शोभतीं हस्तांत
पाशांकुश , भग्नदंत । वरदमुदा शोभते ।।
मूषकांकित रक्तध्वज । करी मिरवी ज्येष्ठराज
रक्तवणीर् महातेज । सा-या देहीं फाकतें ।।
लंबोदर हा शूर्पकर्ण । वस्त्रे ल्याला रक्तवर्ण देहीं सर्वांगाशी रक्तचंदन । मंगलमूर्ती झळकते ।।
रक्तसुमनांच्या मालिका । भक्त वाहती गणनायका
ऐसा विनटतो भक्तसखा । विश्वकर्ता विनायक ।।
प्रकृती अथवा पुरुष । यांच्या पैलाड श्रीगणेश
उग्रमूर्ती , उग्रवेष । मंगलकर्ता भक्तांचा ।।
मनाचिया लोचनांपुढती । ऐसी निर्मुनिया ध्यानमूतीर्
ध्यान करीत जे पूजिती । तेच योगी या जगी ।।
तपश्चर्यांचा अधिपती । व्रातगणांचा गणपती
अवघे देव ज्या आदरिती । तो म्यां भावेंवें वंदिला ।।
एकरदन हा लंबोदर । शिवशक्तींचा प्रियकुमार
भक्तप्रेमी अभयंकर । नमस्कारिला दंती मी ।।
एतदथर्वशीर्षं योधीते स ब्रह्माभूयाय कल्पते ।। स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।। स सर्वत: सुखमेधते ।। स पंचमहापापात्प्रमुच्यते ।। सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ।। प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।। सायंप्रात: प्रयुंजानो अपापो भवति ।। सर्वत्राधीयानोपविघ्नो भवति ।। धर्मार्थकाममोक्षं च विंदति ।।
गणेशभक्तीचा मार्ग आर्ष । देशींमाजी अथर्वशीर्ष
सर्वोपासनाचा आदर्श । अथर्वशीर्षी पूजिला ।।
अथर्वशीर्षाचे अध्ययन । जे जे करिती भाग्यवान
देहीच ब्रह्मात्व येऊन । सायुज्यमुक्ती पावती ।।
विघ्नांची ना होय बाधा । सुखचि लाभे सर्वदा
स्पर्शू न शकती आपदा । गाणपत्या कदापिही ।।
हिंसा किंवा अभक्षभक्षण । चौर्य कीं परस्त्रीगमन
ऐसीं पापंे जाती जळून । गणेशभक्ता पाहता ।।
संध्यासमयी दिवसाअंती । जे जे याचा पाठ करिती
तयांची पापंे भस्म होती । दिवसां घडलीं अजाणतां ।।
पाठ करती जे प्रात:काळीं । दिनजन्माचे रम्यकाळी
रात्री घडली पापावळी । नाश पावे दवांसवे ।।
पठन करती जे त्रिवार । तया न शिवे पापविचार
प्राप्त होती पुरुषार्थ चार । धर्म , अर्थ इत्यादिक ।।
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् ।। यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति ।। सहस्त्रावर्तनात् ।। यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ।। अनेन गणपतीमभिषिंचति स वाग्मीभवति ।। चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान्भवति ।। इत्यथर्वणवाक्यम् ।। ब्रह्मााद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति ।। यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति ।। यो लाजैर्यजति स यशोवान्भवति स मेधावान्भवति ।। यो मोदकसहस्त्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति य: साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते ।। ज्यांना नसे शिष्यभाव । नास्तिकताचि मूळ स्वभाव
गणेशभक्तीची ही ठेव । सांगों नोहो तयांप्रती ।।
अनाधिका-या उपासना । देवो नये कधीं कोणा
दात्या देई हीनपणा । दान ऐसें करो नये ।।
अथर्वशीर्षांची आवर्तनें । सहस्त्रवेळा शुद्धमनें
जे जे करिती भक्त शहाणे । सर्व ईप्सित पावती ।।
अथर्वशीषेर् समंत्रक । करितां गणेश अभिषेक
हाती येते जन्मसार्थक । वक्ता अजिंक्य होईल तो ।।
चतुथीर्च्या मंगल दिवशीं । व्रती राहोनी उपवासी
जे जे करिती मंत्रजपाशीं । विद्यासंपन्न होती ते ।।
शंका न धरावी ये विशीं । प्रत्यक्ष बोलला अथर्वऋषी
सिद्ध सांगे अनुभवाशीं । याचा प्रत्यय आगळा ।।
अथर्वशीर्षा जे जे जपती । ब्रह्मा , माया साग्र जाणिती
निर्भयत्व ते पूर्ण पावती । शरण आणिती भवभूतां ।।
अथर्वशीर्षाचे मंत्रेंकरून । जे दूर्वादले करिती हवन
ते ते होती धनसंपन्न । कुबेर होती पृथ्वीचे ।।
साळीच्या फुलवून लाह्या । जे जे हवनास करतील ह्या
त्यांच्या विघ्नेश धांवे साह्या । विजय त्यांना वंदितो ।।
कराग्री येते तया सिद्धि । सर्वगामी होतसे बुद्धि
चोहोकडून यश समृद्धी । श्रावण वषेर् सौख्याचा ।।
सहस्त्रमोदके करिती हवन । त्यांना पावे शिवनंदन
गजाननाचे वरदान । म्हणजे सर्वस्व लाभते ।।
अष्टौ ब्राह्माणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ।। सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधो वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति ।। महाविघ्नात्प्रमुच्यते ।। महादोषात्प्रमुच्यते ।। महापापात्प्रमुच्यते ।। स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेद ।। इत्युपनिषद्
ॐ सह नाववतु ।। सह नौ भुनक्तु ।। सहवीर्यं करवावहै ।। तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।। ॐशांति: शांति: शांति: ।।
अधिकारी अष्ट ब्राह्माणांस । करील जो मंत्राचा उपदेश
त्याचे देही फुटे प्रकाश । आदित्य चंदासारखा ।।
ग्रहणकाळीं नदीकाठीं । जे जे रमती मंत्रपाठी
सर्व सिद्धि तयासाठीं । अहमहमिका लाविती ।।
प्रतिमेपाशीं बसुनी कोणी । पाठें करितां धन्य वाणी
दोषमुक्त तो होतो प्राणी । सर्व विघ्नें विनाशती ।।
नकळत घडले पापदोष । नष्ट होऊन नि:शेष
पापी पावतो संतोष । पापविचार नासती ।।
किंबहुना पाठकर्ता । स्वयेंचि होतो पापहर्ता
आपणितो सर्वज्ञता । ऐसें महात्म्य पाठाचे ।।
ग्रंथपाठ करतां प्रत्यहीं । अशक्य ऐसें काहीच नाही श्रीगणेशहि प्राप्त होई । गणेशविद्या धन्य ही ।।
गजाननाचा गुणानुवाद । पुरातन हा आर्षनाद
उमासुताथीर् उपनिषद । येथ संपूर्ण जाहलंे ।।
ॐ शांति : शांति: शांति: ।।
अतिश अनंत रेवाळे at 4:14 AM
No comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment