Tuesday, 18 October 2016

घरट

खिडकी बाहेरच्या घरट्यात चिमणा चिमणी बसलेहोते हिरमुसलेले .... चुकल्या चुकल्या सारखे ... काल परवा उडायला शिकलेली पिल्ल भूर्रकन उडून गेली होती ... त्यांच्या नव्या आकाशात... आणि यांच आकाश ... एकट एकट ... भकास... बिच्चारे चिमणा चिमणी ... कदाचित पिल्ल परत येण्याची वाट पाहात असतील एवढ्या कष्टाने घरट बान्धल.. पिल्लाना चारा पणी भरवल... फुला सारख जपत मोठ केल.. आणि पिल्ल साली परक्या सारखी उडून गेलीत ... पिल्लाना शिव्या घालातच होतो .. तेवढ्यात मोबाईल वाजला आई बाबांचा भारतातून फोन होता ... क्षणभर थबकलो ..... आणि नंतर फोन घेण्याची हिंमत झाली नाही.

No comments:

Post a Comment