Monday, 10 October 2016

नवदुर्गेचे सातवे रूप - श्री कालरात्रि माता

🚩नवदुर्गेचे सातवे रूप 🚩

🚩 श्री कालरात्री माता 

🚩 अस्त्र-शस्त्र : तलवार

 🚩वाहन : गाढव

🚩मंत्र :या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🙏🏻

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी
साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे
दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर
झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या
रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारा पासून मिळणार्या पुण्याचा
तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्यलोकांची प्राप्ती होते.🙏🏻🚩

🚩या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केसविस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी
माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही
डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार
आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात.🙏🏻

गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या
उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात
लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात
खड्ग (कट्यार) आहे.कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी
आहे. 🙏🏻
परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे
तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने
भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. 🙏🏻

देवीकालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे.
राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारीआहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचेपूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे.
ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने
होणार्या शुभ कामांची गणना केली जाऊशकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे 🙏🏻

🚩 श्री कालरात्री प्रसन्न 🙏🏻

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🚩🙏🏻

No comments:

Post a Comment