Monday, 10 October 2016

स्वामी समर्थ प्रार्थना

"...... स्वामी समर्था, संकटहर्ता ....." स्वामी समर्था, संकटहर्ता दुबळ्यांचा तू रक्षणकर्ता .. "भिऊ नकोस,पाठीशी आहे" नित्य वचन हे ध्यानी आहे .. रात्रंदिन स्मरणात गुंततो मनोमनी मी तुला वंदितो .. माझे दु:खहरण तू करशी मज आनंदी क्षणही देशी .. शक्य अशक्यासी तू करशी अद्भुत लीला सहज दाविशी .. उपकार तुझे मानु किती मी अनंत जन्मी तुझा ऋणी मी .. !
                 !! श्री स्वामी समर्थ !!
              !! श्री गुरूदेव दत्त दत्त !!
                   स्वामी सकाळ

No comments:

Post a Comment