Monday, 10 October 2016

माहुरची श्री रेणुका देवी

नमस्कार सेवेकरी हो 🙏🏻

आज आपण माहिती घेऊ श्री माहूर च्या श्री रेणुका मातेची 🙏🏻🚩💐

🚩माहूरची श्री रेणुका देवी : एक जाज्वल्य देवस्थान🚩

🚩 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ व पूर्णपीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र माहूरच्या रेणुका देवी या मंदिराला एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच दरवर्षी नवरात्रासोबतच शैक्षणिक सुट्यांच्या वेळी व अन्य सुट्यांच्या वेळी महाराष्ट्रातील अनेक भाविक या देवस्थानाला भेटी देतात.🙏🏻

🚩 नवरात्र उत्सवात तर हा गर्दीचा आकडा सगळेच विक्रम पार पाडून जातो.
माहूरच्या या रेणुका देवीची आख्यायिकादेखील गाजलेली आहे.🙏🏻🚩

🚩 माहूरची रेणुका ही जमदग्नीची पत्नी व श्री परशुरामची माता होय. प्राचीन काही भागीरथीच्या तिरावर रेणू नावाचा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. रेणू राज्याने कन्याकामेश्ठी यज्ञ करून शंकर-पार्वतीला प्रसन्न केले असता यज्ञाच्या अग्नीतून ही कन्या प्रकट झाली. म्हणून तिचे नाव रेणुका असे ठवले. खरे पाहता तिचे पाळण्यातील नाव कमळी असून, स्वयंवराच्या वेळी सर्व राजांना अव्हेरून तपस्वी जमदग्नी ऋषींना तिने वरले आहे. रेणुकादेवी ही राजकन्या, ऋषीपत्नी आणि वीरमाता या विविध भूमिका, रूपासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकच्या यल्लमा या नावाने तिची पूजा, अर्चना केली जाते. माता यल्लमा ही आदिशक्ती भूमीतून प्रकट झाली म्हणून कर्नाटकमध्ये यल्लमाबरोबर भूमातेची पूजा आवर्जून केली जाते. तसेच एकविरा हे सुद्धा रेणुका मातेचे एक नाव असून, कार्ला येथील डोंगरावर एकविरा देवीचे मंदिर आहे. देवी रेणुका ही पार्वतीचाच एक अवतार मानली जात असून, सती रेणुकेचे चारित्र्यसंपन्न जीवन घरोघरी पूजनीय आहे. 🙏🏻

🚩रेणुकेचे पती श्री जमदग्नी ऋषीना स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू आश्रमात होती. रेणुकेला वासू, विश्‍वासू, ब्राह्मध्दान, ब्रहत्कन्न व परशुराम अशी पाच पुत्रे जन्माला आली. रेणुकेला मदनाचे रूप पाहून कामुक भूक येत असल्याचे समजताच जमदग्नीने क्रोधीत होऊन रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा दिली. चार पुत्रांनी हे कार्य करण्यास नकार दिल्याने त्यांना शाप मिळाला तर पिता अज्ञा पाळणार्‍या परशुरामाने आपल्या बाणाने रेणुकेचा शिरच्छेद केला.
कालांतराने राजा सहस्त्रार्जुन आश्रमात येताच कामधेनू त्याच्या दृष्टीस पडते. त्यावेळी राजा श्री जमदग्नीकडे तिची मागणी करतो. परंतु जमदग्नी कामधेनू देण्यास नकार देतात. त्यामुळे क्रोधीत झालेला राजा आश्रमावर हल्ला करून, सर्वांची हत्या करतो तर माता रेणुकेला जखमी करून कामधेनू घेऊन जातो. त्यानंतर आश्रमात आलेल्या परशुरामाला हा सगळा प्रकार दिसताच क्षत्रियांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करून मोकळी भूमी असलेल्या माहूर या दत्तात्रय तीर्थक्षेत्रात जमदग्नी ऋषींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तेव्हापासून रेणुका देवीने माहूर गडावरच राहण्याचे ठरवून सती गेली. त्यावेळी परशुराम शोक करू लागला असता आकाशवाणीनुसार माता रेणुकेने जमिनीतून वर येऊन दर्शन दिले. मात्र परशुरामाने मागे वळून पाहिल्यामुळे केवळ मातेचे मुख दर्शनच घेता आले. माता रेणुकेची मूळपीठावर स्थापना करून श्री परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा पराभव केला आणि श्री परशुरामही दक्षिणेस स्थानापन्न झाले. यामुळे आपणास रेणुकेच्या मंदिरासमोर श्री परशुरामाचेही मंदिर दिसून येते. याठिकाणी परशुरामाला मातेचे दर्शन झाल्याने प्रथम मातापूर, त्यानंतर माहूर असे या गडाला नाव देण्यात आले आहे.🙏🏻🚩

🚩माहूर गडावरील मंदिरात रेणुकेची गळ्यापासून वर अशी भव्य मूर्ती आहे. तिच्यावर शेंदूर लावलेला आहे. श्री रेणुकेच्या मंदिरात सतत नंदादीप तेवत असतो. चैत्र शुक्ल प्रतिपदा चैत्र पौर्णिमा, आषाढ श्रावण पौर्णिमा, अश्‍विन शुद्ध नवरात्र, कार्तिक पौर्णिमा, दत्तजयंती आणि पौष कृष्ण एकादशी या दिवशी माहूर गडावर मोठी यात्रा भरते. पतीच्या संतापाला न जुमानणारी वीरपत्नी रेणुका ही अग्निप्रमाणे तेजस्वी आहे. अशा या जगदंबेचा तेजोमय तांदळा माहूर येथील डोंगराच्या माथ्यावर आहे. डोंगर चढण्यासाठी हजार बाराशे दगडी पायर्‍या बांधलेल्या आहेत. 🙏🏻🚩

🚩संत विष्णुदास यांनी आपला भक्तिभाव पूर्ण काव्याने संपूर्ण महाराष्ट्रात श्री रेणुकादेवीची महती जागृत ठेवली आहे.🙏🏻🚩

आई रेणुका मातेचा उदो उदो 🙏🏻🚩

No comments:

Post a Comment