Tuesday, 18 October 2016

मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रे

मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र---
१) विहित नमुन्यातील अर्ज.
२)अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला (सत्यप्रत)
३)अर्जदाराच्या वडिलांचा/चुलते/आजोबा/ आत्या/चुलत चुलते/ चुलत आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला (सत्यप्रत)
४) १३ आक्टोबर १९६७ पूर्वीचा मराठा अशी जात असल्याचा पुरावा ( शाळा सोडल्याचा दाखला/खरेदीखत जातीची नोंद असलेले/गाव नमुना १४ (जन्म मृत्यु नोंदीचा दाखला) या पैकी ज्यावर जातीचा उल्लेख असेल असे.)
५) रेशनकार्ड झेरॉक्स सत्यप्रत
६) कामगार तलाठी यांचा वास्तव्याचा दाखला
७) अर्जदाराचा १ फोटो
८) वडील/ चुलते/ आत्या/ आजोबा/ चुलत चुलते/ चुलत आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला / जात नमूद असलेले खरेदीखत / गाव नमुना १४ (जन्म मृत्यु नोंदीचा दाखला) या पैकी काहीच नसेल तर-
अ.) पोलीस पाटील यांचा अर्ज दाराचा जातीचा दाखला.
ब.) ग्राम सेवक यांचा अर्ज दाराचा जातीचा दाखला.
क ) तलाठी/ सर्कल यांचा चौकशी अहवाल.
९)शपथपत्र

No comments:

Post a Comment