किती ही काढ मोर्चे
किती ही कर निषेध।
आवाज ऐकणारा कोण
भोगावाच हा जातिभेद।
गत आता तुझी
पुन्हा आहे तीच रे।
माणूस तर तू आहे
पण कर्तुत्वान नीच रे।
ठाव हाय रे इथं
तुहाच बाप भाऊ कापलाय।
जातिवाद्याच्या तेढात
कुटुम्बा नीशी खपलाय।
लाचारी तुही पाहून
त्यांना आलाय माज।
आई बहिनिची अब्रू जाते
कशी वाटत नाही रे लाज।
तरी भी नेत्यान जागुन
झोपेच सोंग घेतलाय।
हातात त्याच्या बांगड्या।
अन लुगड़ त्यान नेसलाय।
No comments:
Post a Comment