Sunday, 18 November 2018

हरी नाम जो विसरला तया हसती लोक रे

हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे । कवडी मोल धन हे सारे, कमविले तु लाख रे ॥धृ॥

कुणाची ही शेतीवाडी, बंगलामाडी कुणाची । कुणाची ही मोटारगाडी, बॆलगाडी कोणाची ।


राहील सारे जाग्यावर, झाल्यावरती राख रे ॥१॥

माय–बापाला छळणारा पुत्र तो नसावा । मेल्यामागे तुप–रोटी देणारा नसावा ।


भुकेल्याची भुक जाण. लोभ सारा टाक रे ॥२॥

थंडीमध्ये कुडकुडणारा देह पाहिला तु । झाकावया नाही गेला दुर राहिला तु ।


मायेचा उबारा दे तु, लाज त्याची राख रे ॥३॥

आज आहे उद्या नाही, क्षणिक ही काया रे । दत्त नामाविणा जाई, जन्म सारा वाया रे ।


श्रीधरा परी भक्तीची, गोडी जरा चाख रे ॥४


No comments:

Post a Comment