दरमहा कामगारांच्या खात्यातून टीडीएस कापला जातो. हा टीडीएस अर्थिक वर्षात दर महिन्याला सारख्याच प्रमाणात कापला जातो. एखाद्या कंपनीतील १० कामगारांचा प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे १ हजार रुपये टीडीएस सामुदायिकरित्या जमा होतो. तो प्रत्येक कामगाराच्या खात्यात जमा होत नाही. काही कालावधीनंतर तो प्रत्येकाच्या खात्यात जमा होतो. कंपनी हा टीडीएस जमा करताना एकरकमी जमा करते. त्याबरोबर कामगारांची नावे देऊन रिटर्न भरते. मात्र, हा टीडीएस वैयक्तिक खात्यात जमा झाला की नाही याची माहिती याअगोदर कामगाराला उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन टीडीएस कापत असली तरीही तो परत मिळवताना असंख्य अडचणी निर्माण होत असत. यंदाच्या वर्षापासून अर्थ मंत्रालयाने कामगारांची अडचण लक्षात घेऊन हा टीडीएस आपल्या खात्यात जमा झाला की नाही याची माहिती कामगारांना दर तीन महिन्यांनी एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावाने प्रत्येक कामागाराला एसएमएस पाठवले गेले आहेत. यामुळे आपल्या खात्यातून जमा झालेला टीडीएस आपल्या पॅनमध्ये जमा झाला की नाही हे लगेचच समजणार आहे.
Monday, 31 October 2016
कामगारांना मेसेज द्वारे मिळणार टीडीएस माहिती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment