Wednesday, 9 November 2016

500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद

काय आहे ही योजना? ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद. या नोटा व्यावसायिक व्यवहारात किंवा दुकानातील खरेदी-विक्रीसाठी वापरता येणार नाहीत. रिझर्व बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत तसेच पोस्टात बदलून मिळतील. 5-yr-old girl needs our support to survive!Ad: Milaap ३. नोटा बदलल्यावर त्याची किंमत किती मिळणार? तुमच्या जवळील रकमेच्या नोटांच्या बदल्यात तेवढ्याच रकमेच्या दुसऱ्या नोटा तुम्हाला मिळतील. ४. या नोटा रोख (कॅश) स्वरूपातच मिळणार का? तुमच्या जवळ ५००-१००० च्या कितीही नोटा असल्या तरी प्रत्येकाला तूर्त ४००० रुपये इतकीच रोख रक्कम सध्या मिळू शकेल. तुमचे बाकीचे पैसे मात्र तुमच्या खात्यात जमा होतील. Nandini is in danger of losing her life!Ad: MILAAP ५. सर्व रोख रक्कम बदलून का मिळणार नाही? मोठ्या नोटा परत घेण्याच्या योजनेत याची सुविधा उपलब्ध नाही. ६. बदलून मिळणाऱ्या ४००० रुपयांच्या रोख रकमेपेक्षा जास्त पैशाची आवश्यकता असेल तर काय? अन्य गरजेसाठी चेक वा इलेक्ट्रॉनिक पेमेंट म्हणजे इंटरनेट बँकिंग, मोबाइल वॉलेट, आयएमपीएस्, क्रेडिट/ डेबिट कार्ड्सचा वापर करू शकता. ७. स्वतःच्या नावाचे बँक खाते नसेल तर काय? Help 16-year-old Dhruv get life-saving treatmentAd: Milaap आवश्यक प्रमाणपत्रासह बँकेत संपर्क करून तुम्ही खाते उघडू शकता. ८. फक्त ‘जनधन योजना’ खाते असेल तर काय? जनधन योजना खातेधारक विहित पद्धतीने पैसे बदलण्याच्या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. ९. नोटा कुठे बदलता येतील? रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत तसेच पोस्टात नोटा बदलून मिळतील. १०. नोटा बदलण्यासाठी कोणत्या बँकेत आणि कोणत्या शाखेत जायचं? तुमच्या बँकेच्या किंवा इतर बँकेच्या कोणत्याही शाखेत तुम्ही ओळखपत्रासह (पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स) जाऊ शकता. एका दिवसात ४००० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास केवळ ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत तुम्हाला जावे लागेल. ज्या बँकेत तुमचे खाते नाही, अशा बँकेच्या शाखेत तुम्ही जात असाल तर आवश्यक वैध ओळखपत्र तुमच्या सोबत न्या. आणि तुमच्या खात्यात ‘इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर’द्वारे पैसे जमा करण्यासाठी त्या खात्याचा तपशील तुम्हाला द्यावा लागेल. ११. बँकेत खाते नसल्यास एखाद्या मित्राच्या खात्यातून नोटा बदलता येऊ शकतात का? हो, नक्कीच. १२. बँकेत स्वतः जाणे शक्य नसल्यास दुसऱ्या कोणालाही पाठल्यास नोटा बदलून मिळतील का? स्वतः गेल्यास उत्तम पण शक्य नसेल तर प्रतिनिधी म्हणून कोणालाही पाठवताना तुम्ही स्वाक्षरी केलेल्या पत्रासह आणि तुमच्या ओळखपत्रासह त्याला पाठवा. १३. एटीएम मधून पैसे काढता येतील का? यासाठी थोडा वेळ लागणार आहे. बँका एटीएममध्ये १००-१०० च्या नोटा टाकेल तेव्हा तुम्ही सहजपणे पैसे काढू शकता. १८ नोव्हेंबरपर्यंत मात्र एकावेळी फक्त दोन हजार रुपयेच काढता येतील. १९ नोव्हेंबर नंतर एटीएममधून ४००० रुपयांपर्यंत रक्कम काढू शकता. १४. चेकद्वारे रोकड काढता येईल का? हो, चेकद्वारे काढता येईल पण त्याची मर्यादा जास्तीत जास्त १०००० आणि एका आठवड्यात एकूण मर्यादा २०००० अशी आहे. (एटीएममधूनही अशा पद्धतीने पैसे काढता येतील) ही अट पहिले २ आठवडे म्हणजे २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत लागू आहे. १५. एटीएमच्या माध्यमातून घेतलेल्या नोटा पुन्हा जमा करता येऊ शकतात का? हो, त्यासाठी कॅश डिपॉझिट मशीनचा वापर करु शकता. १६. एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस/इंटरनेट बँकिंग/मोबाइल बँकिंग या सुविधांचा उपयोग करता येऊ शकतो का? हो, अगदी सुलभतेने या सुविधांचा उपयोग करता येईल. १७. नोटा कधीपर्यंत बदलता येतील. ३० डिसेंबर २०१६ पर्यंत. कोणत्याही बँकेच्या शाखेत, व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, शहरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका आणि आरबीआयमध्ये नोटा बदलून मिळतील. १८. भारतात नसाल तर काय? नोटा बदलण्यासाठी प्रतिनिधी म्हणून जवळील कोणत्याही व्यक्तीला ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड) आणि तुमच्या संमतीपत्रासह बँकेत पाठवू शकता. १९. एनआरआय आणि एनआरओ खातेधारकांसाठी कोणता पर्याय आहे. तुमच्या जवळील ५००-१०००च्या नोटा तुमच्या एनआरओ खात्यात जमा करा. २०. विदेशी पर्यटक असल्यास काय करावे. एअरपोर्ट एक्स्चेंज काऊंटरवर जाऊन मोठ्या नोटा बदलून घेऊ शकता. २१. हॉस्पिटल बिल, औषध खरेदी किंवा प्रवासासाठी तात्काळ रोख रकमेची आवश्यकता असल्यास काय करता येईल? आजपासून ७२ तासांपर्यंत म्हणजे ११ नोव्हेबरपर्यंत हॉस्पिटल बिल, औषध खरेदीसाठी तुमच्या जवळील ५००-१००० च्या नोटा वापरू शकता. तसेच सार्वजनिक बसस्थानके, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवर तिकिट काऊंटरवरही त्या नोटा देऊन तिकीट खरेदी करू शकता. २२. ओळखपत्र कोणती? आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, एनआरइजीए कार्ड, पॅनकार्ड इत्यादी तुम्ही ओळखपत्र म्हणून वापरू शकता. २३. अधिक माहितीसाठी कोणत्या संकेतस्थळावर जाल? www.rbi.org.in वर नोटा बदलण्यासंबंधित आवश्यक माहिती मिळू शकेल. २४. या संबंधी अधिक माहितीसाठी काय करता येईल? रिझर्व बँकेच्या publicquery@rbi.org.in या आयडीवर तुमचे प्रश्न मेल करू शकता. तसेच ०२२-२२६०२२०१/ ०२२-२२६०२९४४ वर फोन करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकाल. प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट Whatsapp Facebook Google PlusTwitter Email SMS Web Title: What To Do With 500 And 1000 Rupee Notes now (Marathi News from Maharashtra Times , TIL Network) कीवर्ड #RBI #Post office #Bank #500 rupee note #1000 Rupee Note अर्थ 01:42 दोन धक्क्यांनी शेअर बाजार धडाधड कोसळला 02:38 सेनसेक्सची १३२ अंकांनी उसळी 04:34 जीएसटीमुळे केंद्र व राज्यामध्ये विभाजन? 04:36 झूमकार आणि मोबाइलआय दरम्यान झाला करार 06:11 विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी लिंक्डइनने सरकारस... 02:10 सेन्सेक्सची १८५ अंकांनी तर निफ्टीची ५० अंकांनी ... 02:22 कर्जाची प्रभावीपणे वसुली हवीः जेटली 02:15 १०,००० कोटी रुपये भरपाई द्या; रिलायन्सला दणका 02:10 सायरस मिस्त्रींवर इंडियन हॉटेल्स बोर्डाचा विश्व... 03:42 GST मध्ये २० लाख रुपये करमुक्त उत्पन्नः जेटली 11:12 जीएसटीवरील चर्चा अजून बाकीः जेटली आणखी अर्थ FROM THE WEB 11-year-old fights aggressive form of cancer!Milaap Paytm to improve access to banks in IndiaHuffington Post Hawaii Tourism Authority & Expedia use smilesADAGE Android snatched 87.5% marketshare in Q3TechRadar FROM MAHARASHTRA TIMES पाकिस्तानी धर्मगुरूला बरेलीच्या दर्ग्यात 'नो एन्ट्री' ऑन टाइमचं टेन्शन शिस्तबद्ध शक्तिप्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार गिरीश निकम यांचं हृदयविकारानं निधन अर्थवृत्त शेअर बाजाराला दुहेरी धक्का Help Madhumitha fight Acute Myleoid LeukemiaAd: Milaap उद्यापासून या नव्या नोटा अनुदानासाठी स्वदेशी कच्चा माल अधिकाधिक विक्री अधिकृतरीत्या होईल आणखी अर्थवृत्त एक दृष्टिक्षेप बातम्या: महाराष्ट्र देश थोडक्यात बातमी विदेश सिटी न्यूज अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक करिअर लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको लाइव टीव्ही इतर फोटो धम्माल व्हिडिओ फोटोगॅलरी इन्फोग्राफिक्स सिटीझन रिपोर्टर आमच्या इतर साइट्स: தமிழ்తెలుగుമലയാളംবাংলাગુજરાતીहिन्दीಕನ್ನಡEnglish आमच्या बद्दलवापर अटीडेस्कटॉप आवृत्ती Copyright © 2016 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights: Times Syndication Service

No comments:

Post a Comment