दुर्गा सप्तशती पाठ केल्यावर अगणित पुण्य मिळते , शिवाय प्रत्येक अध्याय पठणाचे फळ वेगवेगळे आहे . त्याची माहिती आपण आज बघणार आहोत .
१) पहिला अध्याय :- पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठण केल्यास सर्व चिंता दूर होतात , शक्तिशाली शत्रूचा नाश होतो , शत्रू भय नाहीसे होते .
२) दुसरा अध्याय :- दुसरा अध्याय पठण केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावले घर , जागा , जमीन मुक्त होते .
३) तिसरा अध्याय :- तिसरा अध्याय पठण केला असता युद्धात विजय मिळतो , कोर्ट कचेरी , कज्जे , यात विजय होतो !
४) चौथा अध्याय :- चौथा अध्याय पठण केला तर धन मिळते , सुंदर जीवनसाथी मिळतो , व देवी भक्तीचा लाभ मिळतो !
५) पाचवा अध्याय :- पाचवा अध्याय पठण केला तर भक्ती वाढते , भीती नाहीशी होते , भीतीदायक स्वप्न बंद होतात .
प्रेतबाधा , भूतबाधा दूर होते .
६) सहावा अध्याय :- सहावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात .
७) सातवा अध्याय :- सातवा अध्याय पठण केला तर मनात आणलेले काम पूर्ण होते , काही गुप्त हेतू असतील तर ते तडीस जातात !
८) आठवा अध्याय :- धन लाभ होतो , इतरांना वश करता येते . अधिकार प्राप्त होतात !
९) नववा अध्याय :- नववा अध्याय पठण केला असता हरवलेले सापडते , व धनसम्पदा मिळते !
१०) दहावा अध्याय :- धाव अध्याय पठण केला तर , आप्त स्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर परत येतात , मुलाबाळांचे सुख प्राप्त होते !
११) अकरावा अध्याय :- अकरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास व्यापार , धंदा यात मोठा लाभ मिळतो , कर्ज बाजारीपणा नाहीसा होतो , सुख सम्पत्ती मिळते !
१२) बारावा अध्याय :- बारावा अध्याय पठण केला तर रोगराई पासून सुटका होते , आरोग्य लाभते , निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो !
१३ ) तेरावा अध्याय :- तेरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो , धनसम्पदा , सुख समृद्धी मिळते
●|| वास्तु सुख ||●™
No comments:
Post a Comment