Saturday, 3 December 2016

विठुरायाचीही भक्त जनाबाई

🌺आमच्या विठूरायाची लडकी जनाई🌺
🌺प्रेरणा श्रीराम स्वामी समर्थ तुकोबा माउली🌺
✒लेखिका तृप्ति पाटिल✒
संत जनाबाई ही माझी खुप आवडती संत माउली. तिची भक्ति इतकी अप्रतिम होती की देवाला तिने आपल्या ताब्यात केले होते. भक्ति ही तिची काही भक्ति नव्हती एक हृदयाचे नाते देवाशि होते. जसे हृदय हे धड़ धड़ करते तसेच आमच्या जनाइचे हृदय विट्ठल विट्ठल करत होते. इतकी अप्रतिम भक्ति होती. तिने काही ग्रंथ वगरे वाचले नाहीत की कधी कीर्तन प्रवचन दिले नाही. एकदा नामदेव महाराजांनी जनीला किर्तनाला उभे केले होते तेव्हा जनाई म्हणाली मला हां अधिकार नकोय. माझे सद्गुरु नामदेव माउली चा अधिकार आहे. कारण तिला सद्गुरुणा कमिपना द्यायचा नव्हता. तिचे अभंग म्हणजे विठूरायाचे जीवन. विट्ठल तिच्या अभंगात डोलत राहायचा. आमची जनाबाई देवाचे रूप डोळ्यात साठवून अभंग बोलायची. बिचारिणे कधीच आराम नाही केला. सतत काम काम तिला असायचे.14 माणसाचे जेवण सर्व धुनि भांडी एकटी करायची. पण देव तिच्या मदतीला असायचा. सकाळी 3 ला उठायची मग विहिरि जवळ अंघोळ करायची. मग देवपूजा सर्व होइ पर्यन्त 4 वाजायचे.मग आमची जनाई दलन दलायला घ्यायची. पूर्वी चहा हां गुळाचा केला जायचा. चहांपत्ति  वापरायचे मग दूध त्यात शेळीचे नाहीतर गाईचे टाकायचे. खुप सूंदर चहा.जनाबाई स्वयंपाक करायची तर देवाला खुप आवडायचा. एकदा जनाबाई भाकरी करत होती व मरचीचा ठेचा करत होती. देवाला खुप भूक लागली. देवाने जनाइला सांगितले मला थोड़ी भाकर खयला दे. जनाबाई बोलली ठेचा बरोबर भाकर कशी देवु मी. तरीही देव हट्टी. घेतली भाकर व् ठेचा. बापरे तो ठेचा इतका तिखट होता की देवाची जीभ पोललि. जनाबाई हसायला लागली. तुला बोलले ना मी खावु नको तरीही खाल्ली जराहि धीर नाही देवा तुला. देव पण हुशार जनाई हसत होती म्हणून देवाने मूढ़हाम चक्कर एण्याचे नाटक केले. जनाबाई रडायला लागली माझ्या विठाबाइला काय झाले. तिला नव्हते माहीत देवाने तिची गम्मत केलि. ते पण मनापासून देवाला हाक मारली देवा तुला काही झालेले मला सहन नाही होणार. तू माझे जीवन आहे देवा. देव पण हसु लागला व जनाइला जवळ घेतले माझी लेक जनाई. आई कधी लेकराला दूर करेल का माझे लेकरु जनाई.तेव्हा जनाबाई ही 45 ते 50 च्या आसपास वय होते.पहा वयान कितीही मोठे असलो तरीही देवालाआपला भक्त बाळच असतो. सतत स्वताच्या कामात नामस्मरण. तिला काम करायला खुप आवडायचे. कारण काम करतांना विठ्लाचे नाम सतत मुखात असायचे. देव तिच्या बरोबर गप्पा मारायचा तिच्या बरोबर शेतात भाजी आणायला खते आणायला जायचा. कारण जनाइचि भक्ति ही हृदयाची होती. त्यात फक्त देव व जनाई होती. इतकी अप्रतिम भक्ति आमच्या जनाइचि. खरेच सर्वांना विनंती आहे तुम्ही पण जनाई सारखी भक्ति करा. आपन देवाची भक्ति करतो पण सर्व संसारातील सुख मागतो. आमचे लग्न जमु दे पैसा आड़का येवु दे एखादी गाडी यावी बंगला असावा खुप दागिने असावे हे सर्व मागुन आपन देवाला दूर करतो. पण देव मला तू पाहिजे कोणत्याही स्तितित हे मागत नाही. कारण आपल्याला संसार आवडतो कारण संसार दिसतो देव दिसत नाही. पण देवाचा आनंद जो जनाई ने घेतलाय तसा आपल्याला का नाही वाटत आनंद घ्यावा. समर्पण भावनेने भक्ति केलि की सर्व साध्य आहे. देव संत भेट्ने काहीही कठिन नाही. फक्त विश्वास श्र्द्धा नामस्मरण पाहिजे.
🌺सद्गुरुपर्णामस्तु तुकोबा माउली🌺

No comments:

Post a Comment